तालिबानच्या 'कब्जा'मुळे 55% पाकिस्तानी खूश; पाकिस्तानी संस्थेच्या सर्वेक्षणातून आलं समोर

पाकिस्तानची संशोधन कंपनी (Survey on Pakistanis) असलेल्या गॅलप पाकिस्तानने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
तालिबानच्या 'कब्जा'मुळे 55% पाकिस्तानी खूश; पाकिस्तानी संस्थेच्या सर्वेक्षणातून आलं समोर
TalibanDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्याने किमान 55 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पाकिस्तानची संशोधन कंपनी (Survey on Pakistanis) असलेल्या गॅलप पाकिस्तानने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात 2400 लोकांचा समावेश करण्यात आला असून त्यांना विचारण्यात आले की 'तुम्ही अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यावर आनंदी आहात का?' त्यावर, 55 टक्के लोकांनी आनंद व्यक्त केला, तर 25 टक्के लोकांनी ते आनंदी नसल्याचे सांगितले, तर 20 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यास नकार दिला.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीनुसार, खैबर पख्तूनख्वाच्या 65 टक्के लोकांनी तालिबान सरकार स्थापन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय तालिबानशी खूश असणाऱ्यांमध्ये 55 टक्के बलुचिस्तानचे आणि 54 टक्के पंजाब आणि सिंधचे आहेत. तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केला आणि 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश काबीज केला (Pakistan Taliban Update). या दिवशी अफगाणिस्तानचे सरकार कोसळले आणि तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेले. मात्र, पंजशीर प्रांत अजूनही पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आलेला नाही. परंतु तरीही तालिबान्यांनी त्यांचे अंतरिम सरकार स्थापन केले आहे.

Taliban
तालिबान सरकारचा आज होणारा शपथविधी रद्द

कोणत्या वयोगटातील लोक सर्वात आनंदी असतात?

13 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जे दर्शवते की, हे सर्वेक्षण तेव्हाच सुरु झाले जेव्हा बहुतेक प्रांत तालिबानच्या ताब्यात आले होते (Pakistan Taliban Relations). यामधून हे देखील स्पष्ट होते की, कोणत्या वयोगटातील पाकिस्तानी नागरिकांना तालिबान जास्त आवडतो. तालिबान सरकारचे समर्थन करणारे 68 टक्के पाकिस्तानी 50 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आहेत. यापैकी पुरुषांची संख्या 58 टक्के आणि महिलांची संख्या 36 टक्के आहे. जेव्हा तालिबानने काबूलवर कब्जा केला, तेव्हा पाकिस्तानमधून आनंद साजरा केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्याचबरोबर काही पाकिस्तानी नागरिकांनी अनेक ठिकाणी मिठाईही वाटली होती.

Taliban
ताजिकिस्तानपासून पंजशीर 'डिस्कनेक्ट' जाणून घ्या, तालिबान का ठरतोय वरचढ

इम्रान खान यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी तालिबानला पाठिंबा दिला. अफगाणिस्तानने गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या आहेत. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) आणि माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Amarullah Saleh) यांनी पाकिस्तानवर तालिबानला पाठिंबा दिल्याचा वारंवार आरोप केला आहे. परंतु पाकिस्तान हे आरोप वारंवार नाकारतो. अलीकडेच, पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या ISI चे प्रमुख फैज हमीद काबूलच्या दौऱ्यावर आले होते, यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले होते. हमीदच्या भेटीनंतर काही दिवसांनी तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com