Love Story: पठ्ठ्याच्या संयमाला तोड नाही! 35 वर्षांनंतर लग्नासाठी 'हो' म्हणाली क्रश; वाचा नेमंक प्रकरण

Viral Love Story: प्रेमात पडलेल्या मुलीला लग्नासाठी राजी करणं सोपं काम नसतं असं म्हणतात. काहीजण मुलीला लग्नासाठी तयार करायला महिने घेतात.
Marriage
MarriageDainik Gomantak

Viral Love Story: प्रेमात पडलेल्या मुलीला लग्नासाठी राजी करणं सोपं काम नसतं असं म्हणतात. काहीजण मुलीला लग्नासाठी तयार करायला अनेक महिने घेतात.

पण, आता प्रेमाचे असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका व्यक्तीला त्याच्या क्रशला तयार करण्यासाठी 35 वर्षे वाट पाहावी लागली. आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी त्याने 28 वर्षांपूर्वी अंगठी खरेदी केली होती, परंतु तिचा लग्नावर विश्वास नव्हता.

पण नुकतेच असे काही घडले, ज्यामुळे त्याचे आयुष्यचं पालटले. त्याच्या क्रशने शेवटी लग्नासाठी होकार दिला, जेव्हा त्याने खूप रोमँटिक पद्धतीने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या प्रेमकथेबद्दल...

28 वर्षांपूर्वी अंगठी विकत घेतली

द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 60 वर्षीय महिलेचे नाव अँड्रिया मूर आहे. ती लवकरच तिचा 56 वर्षीय बॉयफ्रेंड ग्रॅहम मार्टिनसोबत लग्न करणार आहे.

अँड्रिया आणि ग्रॅहम 1988 पासून एकमेकांना ओळखतात. आणि सुमारे 28 वर्षांपूर्वी ग्रॅहमने अँड्रियाला प्रपोज करण्यासाठी अंगठीही विकत घेतली होती, पण अँड्रियाचा लग्नावर (Marriage) विश्वास नव्हता.

Marriage
USA: आठ वर्षांच्या बहिणीचे अपहरण करायला आला टपोरी, भावाने गलोल ओढली अन्... वाचा धाडसी घटना

GF लग्नावर विश्वास ठेवत नव्हती

तथापि, अँड्रिया आता म्हणते की, ती अनेक वर्षांपासून ग्रॅहमच्या प्रस्तावाची वाट पाहत होती. अखेर या वर्षी फेब्रुवारीमध्ये ग्रॅहमने तिला प्रपोज केले आणि अँड्रियानेही होकार दिला. अँड्रिया लग्न करणार आहे म्हणून खूप आनंदी आहे.

खरे तर, अँड्रियाला वाटत होतं की, लग्नाची गरज नाही. पण आता अँड्रियाचे विचार बदलले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा त्याने अँड्रियाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले तेव्हा ती स्वत:ला रोखू शकली नाही आणि लग्नासाठी हो म्हणाली.

Marriage
Weird Marriage Tradition: स्पर्म व्हेलचा दात ठरवतो 'लग्न', या देशातील अजब प्रथा जाणून तुम्हीही म्हणाल...

एवढेच नाही तर, 56 वर्षीय ग्रॅहमने 60 वर्षीय अँड्रियाला प्रपोज करण्यापूर्वी आपल्या 88 वर्षीय वडिलांची परवानगीही घेतली आणि नंतर प्रपोज केले. लवकरच अँड्रिया आणि ग्रॅहम लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नात अँड्रियाचे वडीलही सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com