जपानमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का; त्सुनामीचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

जपानमध्ये आज शनिवारी 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपनानंतर वेधशाळेकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील उत्तर पूर्व किनारपट्टीच्या भागात हे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

टोकियो:  जपानमध्ये आज शनिवारी 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपनानंतर वेधशाळेकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील उत्तर पूर्व किनारपट्टीच्या भागात हे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

जपानने मागच्या दहा वर्षांपूर्वी मोठा भूकंप आणि त्सुनामी अनुभवली होती. नुकतेच गेलेल्या 11 मार्चला या दुखद घटलनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहे.  जपानच्या वेधशाळेनं आज शनिवारी त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी मायागी भागात हा भूकंप झाला. आणि तेथील   जमिनीपासून 60 किमी आत या भूकंपाचे झटके बसेलेल दिसून आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अजुनतरी या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचं समोर आलं नाही.

जगातील सर्व देशांपैकी जपान हा देश भूकंप प्रवण देश म्हणून ओळखला जातो, याठिकाणी सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतच असतात. पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सची सीमा तयार करणाऱ्या रिंग ऑफ फायरवर हा देश असून भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो.

संबंधित बातम्या