8 वर्षीय निकोल ऑलिव्हिरा बनली जगातील सर्वात तरुण खगोलशास्त्रज्ञ!

अमेरिकन अंतराळ संस्था असलेल्या नासाशी संबंधित लघुग्रह शोधण्यासाठी ऑलिव्हिरा (Oliveira) या प्रोग्राममध्ये सहभागी झाली होती.
8 वर्षीय निकोल ऑलिव्हिरा बनली जगातील सर्वात तरुण खगोलशास्त्रज्ञ!
Nicole OliveiraDainik Gomantak

ब्राझीलच्या (Brazil) फोर्टालेझा (Fortaleza) येथे राहणारी आठ वर्षीय निकोल ऑलिव्हिरा (Nicole Oliveira) जगातील सर्वात तरुण खगोलशास्त्रज्ञ (Youngest Astronomer in World) बनली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था असलेल्या नासाशी संबंधित लघुग्रह शोधण्यासाठी ऑलिव्हिरा या प्रोग्राममध्ये सहभागी झाली होती. युवा एस्ट्रोनोमरच्या मतानुसार, आतापर्यंत ऑलिव्हिराला 18 स्पेस रॉक (Space Rocks) सापडले आहेत. अगदी लहानपणापासूनच ऑलिव्हिराने अंतराळशास्त्रामध्ये आपला रस दाखवला होता. लहानपणापासून ऑलिव्हिरा आकाशातील ताऱ्यांच्या प्रेमातच पडली आहे.

नासासोबत काम केल्यानंतर केवळ आठ वर्षांची निकोल ऑलिव्हिराला 'जगातील सर्वात तरुण एस्ट्रोनोमर’ बनली आहे. अमेरिकन स्पेस एजन्सीचा प्रकल्प ज्याशी ऑलिव्हिरा संबंधित आहे त्याला 'अॅस्टेरॉइड हंटर्स' '(Asteroid Hunters) म्हणून ओळखले जाते. ऑलिव्हिराच्या कुटुबांच्या मते, ऑलिव्हिराची संपूर्ण खोली सौरमंडलाच्या फोटोग्राफ्सने भरलेली आहे. यामध्ये छोट्या रॉकेट्सपासून स्टार वॉर्स पर्यंतच्या फोटोग्राफ्सचा समावेश आहे. ती कम्प्युटरच्या माध्यमातून काम करते. याशिवाय, ती तिच्या टेलिस्कोपच्या माध्यमातून स्पेस रॉकचा शोध घेत असते.

Nicole Oliveira
'तालिबानची आयएसआयशी असलेल्या संबंधांवर बंद दरवाजाआड चर्चा': अमेरिका संरक्षण सचिव

लघुग्रह तिच्या नावावर

'अॅस्टेरॉइड हंटर्स' 'इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल सर्च कोलाबोरेशन' या नासाशी संलग्न असलेल्या नागरिक विज्ञान कार्यक्रमाद्वारे चालवले जातात. निकोल ऑलिव्हिरा या प्रकल्पात सामील होऊ शकली कारण ब्राझीलचे विज्ञान मंत्रालय, नासा आणि अन्य भागीदार संस्थांबरोबर काम करत आहे. निकोलने पुढे सांगितले की, आतापर्यंत 18 लघुग्रहांचा शोध लागला आहे.

Nicole Oliveira
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे ऑस्टिन भारत दौर्‍यावर; या विषयांवर होणार खास चर्चा

ऑलिव्हिरा लुईगी सॅनिनोचा विक्रम मोडेल

ऑलिव्हिरा अकादमी शिष्यवृत्तीवर ईशान्य ब्राझीलमधील फोर्टालेझा शहरातील एका खाजगी शाळेत शिकते. निकोल ऑलिव्हिरा यांनी अवकाशातील खडक म्हणून शोधलेल्या 18 लघुग्रहांची पुष्टी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. परंतु जर ते खरोखरच अंतराळ खडक बनले तर ऑलिव्हिरा अधिकृतपणे लघुग्रह शोधणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती बनेल. ती इटालियन हौशी खगोलशास्त्रज्ञ लुईगी सॅनिनोने (Luigi Sannino) केलेला विक्रम मोडेल. वास्तविक, सॅनिनोने 1998 आणि 1999 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी दोन लघुग्रह शोधले.

Related Stories

No stories found.