Space Hotel: गर्लफ्रेंडसाठी भन्नाट डेट प्लॅन करतायं; 2025 पर्यंत थांबा !
World's First Space HotelDainik Gomantak

Space Hotel: गर्लफ्रेंडसाठी भन्नाट डेट प्लॅन करतायं; 2025 पर्यंत थांबा !

तुम्ही तुमच्या हॉटेलच्या (Hotel) रुममधून उठून बाहेर पाहिल्यास तुम्हाला सौरमंडल आणि अंतरिक्ष दिसल्यास कसे वाटेल?

तुम्ही तुमच्या हॉटेलच्या रुममधून उठून बाहेर पाहिल्यास तुम्हाला सौरमंडल आणि अंतरिक्ष दिसल्यास कसे वाटेल? लवकरच तुम्हाला याची प्रचिती येऊ शकते. वास्तविक, ऑर्बिटल असेंब्ली कॉर्पोरेशन (Orbital Assembly Corporation) नावाची कंपनी एक स्पेस स्टेशन बनवत आहे, जे 2025 पर्यंत लोकांसाठी खुले होईल. जगातील पहिल्या अंतराळ हॉटेलला (Hotel) 'पायोनियर स्टेशन' (Pioneer Station) असे नाव देण्यात आले आहे. (A company called Orbital Assembly Corporation will open the world's first space hotel by 2025)

दरम्यान, ऑर्बिटल असेंब्लीचे म्हणणे आहे की, ''आमचे व्हॉयेजर स्टेशन 400 लोकांना सामावून घेऊ शकते, परंतु ते 2027 पर्यंत कार्यरत असेल. पायोनियर स्टेशनमध्ये फक्त 28 लोक राहण्यास सक्षम असतील, ते 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. स्पेस स्टेशनच्या आतील खोल्यांमधून बाहेर पाहिल्यास, तुम्हाला पृथ्वीवरील (Earth) हॉटेलचे दृश्य दिसणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या खिडकीबाहेर अंतरिक्ष दिसेल.''

World's First Space Hotel
UAE मध्ये 25 वर्षे ट्रक चालवणारा भारतीय, रातोरात बनला करोडपती

तसेच, ऑर्बिटल असेंब्लीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर टिम अल्लाटोयर यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, "स्पेस स्टेशनवर जाणे हे फॅक्ट्री किंवा रिसर्च फॅसिलिटीमध्ये जाण्यासारखे होणार नाही." त्याऐवजी, स्पेस स्टेशन तुमच्यासाठी स्वप्नासारखे दिसेल. ऑर्बिटल असेंब्ली कॉर्पोरेशन ही अमेरिकन कंपनी आहे.

दुसरीकडे, ऑर्बिटल असेंब्लीचे म्हणणे आहे की, ''स्पेस स्टेशनवर काही ठिकाणी आर्टिफिशियल ग्रॅविटी असेल. परंतु काही ठिकाणी असे होणार नाही, जेणेकरुन पर्यटक अंतराळात राहण्याचा आणि बास्केटबॉल खेळण्याचा आनंद घेऊ शकतील.''

World's First Space Hotel
जगातील सर्वात 'आनंदी' देशात PM मोदी; डेन्मार्कशी संबंधित या गोष्टी वाचून व्हाल थक्क

याशिवाय, अंतराळ पर्यटन (Tourism) हा अलीकडच्या काळात चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी वैयक्तिक अंतराळ प्रवास करणे खूप महाग आहे. मात्र, आगामी काळात यात बदल होऊ शकतो, असे ऑर्बिटल असेंबली वाटते. टीम अलाटोर म्हणाले, 'केवळ श्रीमंतांसाठीच नव्हे तर सर्व लोकांसाठी अंतरिक्षात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत.'

त्याचबरोबर, आमचे स्पेस स्टेशन 2025 आणि 2027 पर्यंत कार्यान्वित करण्यासाठी, ऑर्बिटल असेंब्लीला पूर्णपणे निधीवर अवलंबून राहावे लागेल. मात्र, हे शक्य होईल, असा विश्वास टीम अलाटोर आणि त्यांच्या टीमने व्यक्त केला आहे.

World's First Space Hotel
इलॉन मस्क जगातील श्रीमंत व्यक्ती, संपत्ती ऐकून व्हाल थक्क !

शिवाय, अंतराळ पर्यटन पूर्वीपेक्षा आता खूप वेगाने होत असल्याचे दिसत आहे. ब्रिटीश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन अलीकडेच त्यांच्या कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या माध्यमातून सबर्बिटल स्पेसमध्ये गेले. त्याच वेळी स्टार ट्रेक अभिनेता विल्यम शॅटनरने ब्लू ओरिजिनच्या (Blue Origin) माध्यमातून अंतराळ प्रवास केला. अशा प्रकारे ते अंतराळात जाणारे सर्वात वृद्ध व्यक्ती ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.