माझ्याविरोधात बंद खोलीत षडयंत्र रचले जात आहे : इम्रान खान

इम्रान खान यांनी आपले सरकार पडण्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

पाकिस्तान आणि परदेशात आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. पंजाब प्रांतातील सियालकोट येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित करताना खान म्हणाले, मला मारण्याचा कट रचला जात आहे. काही दिवसांपूर्वी मला याची माहिती मिळाली. (A conspiracy is being hatched against me in a closed room, says Imran Khan)

Imran Khan
Sri Lanka Crisis: महिंदा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र!

रॅलीत इम्रान खान म्हणाले की, माझ्याविरोधात देशात आणि परदेशात बंद खोलीत षडयंत्र रचले जात आहे. मी या कटाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये सर्व लोकांची नावे आहेत. मला काही झाले तर या कटामागे कोणाचा हात होता हे लोकांना कळेल.

इम्रान खान यांनी आपले सरकार पडण्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले. ते म्हणाले की, त्यांनी लष्करी आस्थापनांना हस्तक्षेप करून त्यांचे सरकार वाचवण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी काहीही केले नाही. आम्ही पैगंबरांचे अनुयायी आहोत आणि आम्ही कधीही कोणत्याही महासत्तेपुढे झुकणार नाही. आम्ही कधीही घाबरत नाही.

Imran Khan
Video: एलन मस्क यांच्या SpaceX ने रॉकेटसह 53 सॅटेलाइट केले लॉन्च

रॅलीमध्ये, खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपीचे आसिफ अली झरदारी आणि जेयूआय-एफचे मौलाना फजलुर रहमान यांना लक्ष्य केले आणि त्यांना स्वातंत्र्य चळवळीत अडथळा बनू नका असा इशारा दिला.

इम्रान खान यांच्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, खान यांनी आता लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांच्या हत्येची ही खोटी कहाणी मांडली आहे. जवळपास चार वर्षे सत्तेत राहूनही ही व्यक्ती काहीच शिकलेली नाही, असेही ते म्हणाले. आता खान म्हणत आहेत की कदाचित अमेरिका आणि त्यांचे विरोधक त्यांच्या विरोधात काहीतरी कट रचत आहेत. या वेड्याला पाकिस्तानच्या राजकारणात स्थान नाही, असे आसिफने एका खासगी टीव्ही वाहिनीशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com