Nose Grown On Hand: डॉक्टरांनी महिलेच्या हातावर उगवले नाक; फ्रान्समध्ये विचित्र शस्त्रक्रिया

त्याच नाकाचे नंतर चेहऱ्यावर यशस्वी प्रत्यारोपण
Nose Grown On Hand
Nose Grown On HandDainik Gomantak

Nose Grown On Hand: फ्रान्समध्ये डॉक्टरांनी एक नवा कारनामा केला आहे. डॉक्टरांनी प्रथमच एका महिलेच्या हातावर चक्क नाक उगवून दाखवले आहे. आणि नंतर त्याच नाकाचे चेहऱ्यावर यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले. (Doctor Grown Nose On Woman Arm)

Nose Grown On Hand
Twitter Blue Tick: ट्विटरचा मोठा निर्णय, फेक अकाऊंटमध्ये वाढ झाल्याने पेड सबस्क्रिप्शन मागे

संबंधित महिलेला कॅन्सर असून त्यावरील उपचारात तिने 2013 मध्ये रेडियोथेरेपी आणि कीमोथेरेपी घेताना नाकाचा काही भाग गमावला होता. त्यानंतर नाक पुर्ववत होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला गेला होता. पण त्यात यश आले नव्हते. अखेर डॉक्टरांच्या अभुतपुर्व कामगिरीने संबंधित महिलेला तिचे नाक परत मिळाले आहे. तिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

कार्टिलेज बदलण्यासाठी 3 डी प्रिंटेड बायोमटेरियलपासून एक नाक बनवले होते. त्या नाकाचा पुढील भागकापून चेहऱ्यावर लावला होता. डॉक्टरांनी हे नाक संबंधित महिलेच्या बाहुवर उगवले आणि नाक झाकण्यासाठी त्यावर स्किन ग्राफ्टचा वापर केला. दोन महिने नाकाची वाढ होऊ दिली. त्यानंतर तिथून काढून हे नाक पुर्ववत चेहऱ्यावर प्रत्यारोपित केले. मंगळवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Nose Grown On Hand
Himachal Election 2022: हिमाचल प्रदेशात मतदासानासाठी प्रथमच क्युआर कोडचा वापर; पहिल्या 3 तासात 10 टक्के मतदान

टुलूज विद्यापीठ रूग्णालयाने फेसबुकवर या हातावर उगवलेल्या नाकाचा फोटो शेअर केला आहे. डॉक्टरांनीही हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. मायक्रोसर्जरीद्वारे डॉक्टरांनी हाताच्या त्वचेतील रक्तवाहिन्यांना महिलेच्या चेहऱ्यातील रक्तवाहिन्यांशी जोडले. सध्या या प्रत्यारोपणावर निगराणी ठेवली जात आहे. हाडांची पुनर्निर्मिती करणाऱ्या उपकरणांसाठी बेल्जियमच्या सेहहुम कंपनीसह डॉक्टरांच्या पथकाचे धन्यवाद, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. हे तंत्रज्ञान अन्य नव्या तंत्रज्ञानाचे द्वारे खोलू शकते, असेही फ्रान्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com