सिएरा लिओनमध्ये तेलाच्या टँकरमध्ये भीषण स्फोट, 92 जण ठार

देशाची राजधानी फ्रीटाऊनमध्ये (Freetown) ही घटना घडली आहे.
Freetown
FreetownDainik Gomantak

आफ्रिकन देश असलेल्या (African Countries) सिएरा लिओनमध्ये (Sierra Leone) एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे किमान 92 लोकांचा मृत्यू झाला आहे (Blast in Africa). तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी फ्रीटाऊनमध्ये (Freetown) ही घटना घडली आहे. 40 फूट उंच तेलाच्या टँकरने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने ही घटना घडली. यानंतर त्यात मोठा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिक माध्यमांनी या घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये टँकरभोवती लोकांचे मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.

दरम्यान, महापौर इव्होन अकी-सॉयर यांनी व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर या घटनेचे वर्णन 'भयानक' असे केले आहे. किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याचेही ते म्हणाले. फेसबुक पोस्टद्वारे महापौर म्हणाले की, 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची अफवा आहे. अधिकृत मृतांची संख्या जाहीर केली असली तरी एका अधिकाऱ्याने 92 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्याचवेळी या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Freetown
अफगाणिस्तान पुन्हा हादरले, काबूलमध्ये मोठा स्फोट

सुपरमार्केट बाहेर अपघात

वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सरकारी माध्यमांनी 92 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. परंतु नेमका आकडा अद्याप कोणालाही माहीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Sierra Leone मध्ये स्फोट) शहरातील वेलिंग्टन परिसरातील एका व्यस्त सुपरमार्केटच्या बाहेर हा स्फोट झाल्याचे समजते. सिएरा लिओनच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख ब्रिमा बुरेह सेसे यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की हा "भयंकर अपघात" होता. या किनारी शहरामध्ये दहा लाखांहून अधिक लोक राहतात. ज्यांनी अलिकडच्या वर्षांत अनेक गंभीर संकटांचा सामना केला आहे.

सतत अडचणीत असलेले लोक

मार्चच्या सुरुवातीला, शहरातील झोपडपट्टीत (Sierra Leone) भीषण आग लागल्याने 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. आगीच्या घटनेनंतर 5,000 हून अधिक लोकांना बेघर व्हावे लागले. 2017 मध्ये अतिवृष्टीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शहरात भूस्खलनही झाले होते, ज्यामुळे सुमारे 3,000 लोक बेघर झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com