फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा 'IHU' नवा व्हेरिएंट, ओमिक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य

फ्रान्समध्ये (France) कोरोनाचा या नवा व्हेरिएंट आढळला असून, ज्याला IHU असे नाव देण्यात आले आहे.
IHU Variant

IHU Variant

Dainik Gomantak 

जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये कोरोनाचा या नवा व्हेरिएंट आढळला असून, ज्याला IHU असे नाव देण्यात आले आहे. आरोग्य तज्ज्ञ या व्हेरिएंटला कोरोनाच्या झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपेक्षा (Omicron Variant) जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगत आहेत.

पहिला रुग्ण 10 डिसेंबर रोजी आढळला

फ्रान्समधून (France) आतापर्यंत IHU या व्हेरिएंटची लागण झालेले 12 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण मार्सिलेमध्ये आढळून आले आहेत. शास्त्रज्ञांचे मते, या नव्या व्हेरिएंटचा संबंध दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) कॅमेरुनशी आहे. या संसर्गाची लागण झालेला पहिला रुग्ण 10 डिसेंबर रोजी समोर आला होता. तथापि, WHO ने अद्याप तपासणीसाठी प्रस्तावित केलेले नाही.

<div class="paragraphs"><p>IHU&nbsp;Variant</p></div>
Omicron variant चा कोणत्या लोकांना धोका,जाणून घ्या

IHU Omicron पेक्षा जास्त घातक

IHU Mediterranee Infection या फ्रेंच संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा नवा व्हेरिएंट शोधून काढला आहे. ज्याला शास्त्रज्ञांनी IHU असे नाव दिले आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, नवीन व्हेरिएंट IHU 46 वेळा म्यूटेशन बदलतो. जो Omicron पेक्षा जास्त घातक आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्गजन्य व्हेरिएंट असल्याचे मानले जाते.

व्हायरसमधील म्‍यूटेशन धोकादायक: आरोग्य तज्ञ

फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगल-डिंग यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे नव-नवे व्हेरिएंट भविष्यात अधिक दिसून येतील परंतु ते अधिक धोकादायक असतील असे नाही. मूळ विषाणूच्या तुलनेत व्हेरिएंटचे म्यूटेशन धोकादायक आहेत.

24 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नमुन्यातून ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला

आरोग्य तज्ञांना गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा सर्वात संसर्गजन्य मानल्या जाणार्‍या ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी माहिती मिळाली होती. खरं तर, गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी, दक्षिण आफ्रिकेतून घेतलेल्या नमुन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता, तेव्हापासून, केवळ 40 दिवसांहून अधिक काळ, कोरोनाचा हा व्हेरिएंट जगातील 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com