Lebanese Army News: तब्बल 232 स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले पण...

लेबनॉनच्या सैन्याने केली पराक्रमाची शर्थ
Lebanese Army News
Lebanese Army NewsDainik Gomantak

Lebanese Army News: बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज लेबनॉनमधील सेलाटा शहराच्या किनारपट्टीवर बुडाले. या दुर्घटनेत दोन स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. तथापि, जहाज बुडू लागल्याचे समजताच लेबनीज लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जहाजावरील तब्बल 232 जणांची सुखरूप सुटका केली आहे. लेबनॉनमध्ये उपस्थित संयुक्त राष्ट्रांच्या दलाच्या सहकार्याने लेबनीज सैन्याने हे ऑपरेशन पार पाडले.

Lebanese Army News
Pakistan: पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकते, नववर्षाच्या स्वागताला गोळीबार झाला अन्...

ही घटना शुक्रवारची आहे. लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेला असलेल्या सेलाटा शहराला लागून असलेल्या समुद्रातून हे जहाज प्रवास करत होते. निर्वासितांना घेऊन जाणारे हे जहाज बुडू लागले होते. ही माहिती मिळताच लेबनॉनच्या सैन्यासह लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या युनायटेड इंटरिम फोर्स (UNIFIL) द्वारे संचालित तीन नौदल जहाजे आणि एक बोटीने घटनास्थळी धाव घेतली. या जहाजात लेबनॉन, सीरिया आणि पॅलेस्टाईनमधील महिला, पुरुष आणि मुले होती जी सुरक्षित भविष्याच्या शोधात स्थलांतर करून जात होती.

Lebanese Army News
Dalai Lama: चीन बौद्ध धर्माला विष समजतो-दलाई लामांचे मोठे विधान

लेबनीज सैन्याने 232 जणांना वाचवले आहे. तर या अपघातात एक महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही सीरियन आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलाने म्हटले आहे की, त्यांनी लेबनीज सैन्याला आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या जहाजावर बचावकार्यासाठी मदत केली. बचाव मोहिमेदरम्यान सुटका करण्यात आलेल्या लोकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने त्रिपोली बंदरावर उपस्थित आहेत, जिथे ते आपल्या प्रियजनांच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com