पाकिस्तानी कुटुंबीयांचं किळसवाणं कृत्य, 'आपल्याच देशातील महिलेला...'

अमेरिकेच्या (America) फेडरल ज्युरीने शुक्रवारी पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन कुटुंबाला एका पाकिस्तानी महिलेकडून 12 वर्षे सक्तीने मजुरी केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
पाकिस्तानी कुटुंबीयांचं किळसवाणं कृत्य, 'आपल्याच देशातील महिलेला...'
WomenDainik Gomantak

अमेरिकेच्या फेडरल ज्युरीने शुक्रवारी पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन कुटुंबाला एका पाकिस्तानी महिलेकडून 12 वर्षे सक्तीने मजुरी केल्याप्रकरणी दोषी ठरवले. फेडरल ज्युरीने कुटुंबातील सदस्य झाहिदा अमान, मोहम्मद नोमान चौधरी आणि मोहम्मद रेहान चौधरी यांना पीडितेचा 12 वर्षांहून अधिक काळ शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल दोषी ठरवले. या प्रकरणातील दोषींना 5 ते 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते (Compulsory work in the United States). एका प्रसिद्धीपत्रकानुसार, 'पीडित महिलेचा पाकिस्तानी-अमेरिकन कुटुंबाने छळ केला.' (A US federal jury has convicted an American family of Pakistani descent of forcing a Pakistani woman to work for 12 years)

प्रसिद्धीपत्रकानुसार, 'पीडितेला मारहाणही करण्यात आली. एकदा तर महिलेला हातपाय बांधून पायऱ्यांवरुन खाली फेकले. पीडित महिलेचा (Women) नवरा निघून गेल्यानंतरही त्यांनी तिला केवळ त्यांच्या व्हर्जिनियातील घरातच ठेवले नाही, तर अत्यंत कठीण कामे करण्यास भाग पाडले, असा आरोप कुटुंबीयांवर करण्यात आला आहे.

Women
संकटात सापडलेल्या श्रीलंकेला पुन्हा भारताची साथ

महिलेच्या विश्वासाचा फायदा घेतला

दुसरीकडे, सहाय्यक ऍटर्नी जनरल क्रिस्टन क्लार्क म्हणाले, "प्रतिवादींनी पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तिला घरगुती मदतनीस म्हणून कामावर आणण्यासाठी तिचा क्रूर आणि अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ केला."

"आधुनिक काळात आपल्या देशात किंवा जिल्ह्यात सक्तीच्या मजुरीला स्थान नाही," जेसिका डी' एबर, व्हर्जिनियाच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या यूएस अ‍ॅटर्नी म्हणाल्या. असे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हा निर्णय कामगार तस्करीच्या जघन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Women
चीनचा LAC वरुन सैन्य मागे घेण्यास नकार; भारताची डोकेदुखी पुन्हा वाढणार ?

शिवाय, पाश्चिमात्य देशांमध्ये सक्तीच्या मजुरीच्या विरोधात नियम आधीच ठरलेले आहेत. तरीही कोणी हा गुन्हा केला तर त्याला सर्वात कठोर शिक्षा होते. स्थलांतरित लोक त्यांच्या देशातून गरीब महिलांना परदेशात आणून त्यांना कामाला लावतात अशीही काही प्रकरणे घडली आहेत. पीडितेच्या पासपोर्टसह (Passport) इतर कागदपत्रेही काढून घेतली जातात. त्यामुळे ते आपल्या देशात परत जाऊ शकत नाहीत. मदतही मागू शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.