अमेरिकेत पुन्हा हिंसाचाराची शक्यता; सुरक्षा विभागाने दिला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने बुधवारी देशभरात दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याचा इशारा जाहीर केला आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने देशभरात दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याचा इशारा जाहीर केला आहे. नवनिर्वीचित अध्यक्ष जो बायडन यांना विरोध दर्शविण्यासठी देशांतर्गत सरकार विरोधी अतिरेक्यांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा हवाला त्यांनी यावेळी दिला."माहितीवरून असे सूचित होते की काही वैचारिकदृष्ट्या प्रवृत्त हिंसक अतिरेकी, ज्यांना अमेरिकेत झालेल्या राजकिय बदलांवर आणि जो बायडन यांच्या राष्ट्रपती होण्यावर आक्षेप आहे त्यांच्याकडून काही अफवा पसरवून अथवा भडकावू मजकूर प्रकाशित करून हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो”, असे अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने सूचित केले.

बायडन प्रशासनाचा पाकिस्तानला झटका

नॅशनल टेररिझम अ‍ॅडव्हायझरी सिस्टम बुलेटिनच्या माहितीनुसार 20 जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या यशस्वी उद्घाटनानंतर या हल्ल्याची शक्याता आहे. हिंसाचार नक्की कुठे, कसा करण्यात येईल याबाबतची माहिती आद्याप प्राप्त झालेली नाही.

भारताने 59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे चिनी सरकारला राग अनावर

"तथापि, अलिकडच्या काळात हिंसक दंगली सुरूच आहे आणि आम्हाला काळजी आहे की सरकारी अधिकारी आणि झालेल्या राजकिय बदलांना विरोध करणाऱ्या व्यक्ती वैचारिकदृष्ट्या प्रवृत्त झालेल्या लोकांना उद्युक्त करण्यास किंवा हिंसाचार घडवण्यासाठी प्रवृत्त करू शकतात”, असे नॅशनल टेररिझम अ‍ॅडव्हायझरी सिस्टमने सांगितले. अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यापासून सशस्त्र अतिरेकी गटांच्या सदस्यांसह दीडशेहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली आणि हिंसाचाराच्या धमक्यांची माहिती द्यावी, असे आवाहन सुरक्षा विभागाने जनतेला केले आहे.

 

 

 

संबंधित बातम्या