फॉर्च्युन मासिकातील महान लोकांच्या यादीत आदर पूनावाला अग्रस्थानी 

adar punawala.jpg
adar punawala.jpg

वॉशिंग्टन :  कोरोना विषाणू साथीच्या युद्धात संपूर्ण जग लढत आहे.  मात्र पहिली लाट संपता संपता काही देशांनी कोविड-19 प्रतिबंधक लस तयार करून संपूर्ण जगाला एक आशेचा किरण दाखवला आहे. जगभरातील अनेक लस निर्माता कंपन्या  या युद्धात मोलाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे या युद्धात भरताने देखील आपले योगदान दिले आहे. भरतातील महाराष्ट्रातील पुणे स्थित सीरम  इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड-19 प्रतिबंधक लस बनवून भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिलासा दिला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या याच कामाची दखल घेत प्रसिद्ध नियतकालिक फॉर्च्युन'ने संस्थेचे कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना महान व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. (Adar Poonawala tops the list of great people in Fortune magazine) 

कोरोनाव्हायरसशी युध्दात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड-19 प्रतिबंधक लस बनविल्याने फॉर्च्युनने जगातील 50 महान व्यक्तींच्या आदर पूनावाला यांना स्थान दिले आहे.  विशेष म्हणजे फॉर्च्युनने आदर पूनावाला यांना पहिल्या दहा व्यक्तींमध्ये स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा पूनावाला ही एकमेव भारतीय आहे. फॉर्च्युनने जारी केलेल्या या यादीत  कोरोनाशी अधिक चांगला प्रकारे लढा देणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

फॉर्च्युन मासिकाच्या यादीमध्ये न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना प्रथम स्थान मिळाले आहे. जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे आणि उपाययोजनांचे फॉर्च्युनने कौतुक केले आहे. जेसिंडा आर्डर्न यांच्या नंतर दुसऱ्या स्थानावर एमआरएनए पायनियर्स, तिसऱ्या स्थानावर डॅनियल एच शुल्मन, चौथ्या स्थानावर  डॉ जॉन नेकेनसॉन्ग, पाचव्या स्थानावर एनबीए रेस्क्यूअर, तर सहाव्या स्थानावर जेसिका टॅन, सातव्या स्थानावर जस्टिन वेलबी, आठव्या स्थानावर स्टेसी अब्राम, नवव्या स्थानावर  रेशोर्ना फिट्झपॅट्रिक,  तर दहाव्या स्थानावर अदार पूनावाला यांचं समावेश केला आहे. 

फॉर्च्युन मासिकाने आदार पूनावालासाठी लिहिले की, "जागतिक कोरोना महामारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक लस जगाला प्रदान करण्यासाठी पुनावाला ओळख आहे. पूनावाला जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) प्रमुख आहेत. पूनावाला  यांची ही कंपनी जागतिक लस इक्विटी उपलब्ध करुन देत आहे, इन्फ्लूएन्झा, गोवर आणि टिटॅनस या आजारांविरुद्ध लढा देण्यासाठी कमी किमतीच्या लस उपलब्ध करुन दिली आहे.

एसआयआय कडून  कोव्हॅक्सिनला   
एसआयआयने कोवॅक्सला येत्या काही वर्षांत 2 अब्ज लसीचे डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. अल्प-मध्यम व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लसी देण्यासाठी  हा जागतिक पुढाकार आहे. विशेष म्हणजे सीरम संस्थेने कोविशिल्ड नावाने लस तयार केली आहे. याशिवाय भारत बायोटेकने भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन लसही लसीकरणांसाठी वापरली जात आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com