"देशातील मोठ्या हस्तींकडून आपल्यावर दबाव आणला जातोय"

दैनिक गोमंतक
शनिवार, 1 मे 2021

सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी लंडन केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना लस हा एकमात्र योग्य उपाय असल्याचे दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला शनिवारी सुरुवात झाली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोना लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी लंडन केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Adar Poonawala has alleged that he is being pressured)

सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संचालक आदर पुनावाला यांनी लंडन मध्ये लसीकरण आणि त्यासंदर्भातील काही महत्वाच्या बाबींवर भाष्य केल्याचे दिसून येते आहे. आदर पुनावाला यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये "भारतातील काही मोठ्या हस्ती कोरोना लसीची मागणी करताना आक्रमक होता आहेत." असा आरोप केला आहे.

आदर पुनावाला (Adar Poonawalla) हे आपल्या मुली आणि पत्नीसह सध्या लंडन (London)  मध्ये गेले असल्याची माहिती मिळते आहे. आपण पुढचे काही दिवस इथेच राहणार असून, पुन्हा 'त्या' परिस्थितीत जाण्याची आपली इच्छा नसल्याचे मत देखील यावेळी आदर पुनावाला यांनी व्यक्त केले आहे. सर्वकाही आपल्यावर लोटले जात आहे मात्र एकट्याने आपण या परिस्थितीला सामोरे जाऊ शकत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. प्रत्येकालाच वाटते आहे की आपल्याला लस मिळावी, आणि त्यासाठी ते आक्रमक पवित्रा घेत असल्याची माहिती आदर पुनावाला यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. 

''भारतात लॉकडाऊन करा'' अमेरिकेच्या आरोग्य सल्लागारांचा सल्ला

लंडनमध्ये येऊन आदर पुनवाला यांनी भारताच्या बाहेर लसीची निर्मिती आणि विक्री संदर्भातील अप्रत्यक्ष इशाराच दिला असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. ज्यामध्ये आदर पुनावाला यांची ब्रिटनला पसंती असल्याचे समजते आहे. भारताबाहेर लसीची विक्री आणि निर्मिती बद्दल आदर पुनावाला यांना विचारण्यात आले त्यावेळी लवकरच या बद्दलची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आदर पुनावाला यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. 

 

संबंधित बातम्या