Afghanistan: पहिल्यांदाच 106 अफगाणी नागरिक दिल्लीहून इराणमार्गे काबूलला रवाना

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हवाई सेवा बंद करण्यात आली होती.
Mahan Air
Mahan AirDainik Gomantak

तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच भारतात अडकलेले 106 अफगाण नागरिक शुक्रवारी दिल्लीहून आपल्या मायदेशी परतल्या. हे अफगाण नागरिक इराणमार्गे अफगाणिस्तानात गेले. महान एअरने काबूल (Kabul) येथून उड्डाण सेवा सुरु केली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. ट्रॅफिकच्या व्यत्ययामुळे दिल्लीहून महान एअरचे (Mahan Air) कोणतेही नियमित उड्डाणे नाहीत. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Hamid Karzai International Airport) हवाई सेवा बंद करण्यात आली होती.

दरम्यान, अफगाण नागरिकांचा हा पहिला गट जो दिल्लीहून अफगाणिस्तानला रवाना झाला आहे. अद्याप भारताने काबूलला थेट विमान सेवा सुरु केलेली नाही. तालिबान राजवटीने अलीकडेच डीजीसीएला पत्र लिहून विमान सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली असून भारताने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. अफगाणिस्तान दूतावास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने समन्वय साधला असून अफगाण नागरिकांना परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली अशी माहिती देण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दिल्लीसाठी विशेष महान एअर फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती. अफगाण नागरिकांनी स्वतः त्यांच्या तिकिटांसाठी पैसे मोजले होते. महान एअरकडे दिल्लीहून कोणतीही नियमित उड्डाणे नाहीत. अफगाण नागरिकांना आपल्या मायदेशी नेण्यासाठी या फ्लाइटची खास व्यवस्था करण्यात आली होती. 106 अफगाण नागरिकांपैकी बहुतेक रुग्ण होते जे 15 ऑगस्टपूर्वी येथे उपचारासाठी आले होते आणि तेव्हापासून इथेच अडकले होते.

Mahan Air
'पख्तूनांना तालिबान बद्दल सहानभूती'; इम्रान खान यांचं धक्कदायक विधान

तसेच, गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या नागरी उड्डयन संस्थेकडून सांगण्यात आले की, काबुल विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार असून तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत. यासंबंधीची घोषणा करताना देशातील नागरी उड्डयन प्राधिकरणाने सांगितले की, काबूल विमानतळावरुन विमानांचे ऑपरेशन पूर्णपणे सुरु झाले आहेत. सामान्य उड्डाणे पुन्हा सुरु करण्यासाठी पूर्ण पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. अफगाण नागरी उड्डाण संस्थेचे प्रवक्ते मोहम्मद नईम सालेही म्हणाले होते की, नागरी उड्डाण मंत्रालयाने शेजारील देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा हवाई सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com