Afghanistan Government: मुल्ला हसन अखुंद होणार तालिबान सरकारचा प्रमुख

मुल्ला हसन अखुंद (Mullah Hasan Akhund) अफगाणिस्तानचे नवे प्रमुख बनू शकतात.
Afghanistan Government: Mullah Hasan Akhund will be a head of Afghanistan
Afghanistan Government: Mullah Hasan Akhund will be a head of AfghanistanDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर पुढील सरकार स्थापनेची तयारी अधीक वेगाने सुरू झाली आहे. यापूर्वी सरकार स्थापनेचे काम गेल्या आठवड्यातच करायचे होते, परंतु काही कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले. असे मानले जाते की बुधवारी तालिबानचे नवीन सरकार स्थापन (Afghanistan Government) होईल किंवा येत्या काही दिवसात ते निश्चित होईल. मुल्ला हसन अखुंद (Mullah Hasan Akhund) अफगाणिस्तानचे नवे प्रमुख बनू शकतात. हे नाव आश्चर्यकारक आहे, कारण आतापर्यंत मुल्ला बरदार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची माहिती समोर येत होती.(Mullah Hasan Akhund will be a head of Afghanistan)

द न्यूज'च्या वृत्तानुसार, खुद्द हिबतुल्ला अखुंजादा यांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांना रईस-ए-जमहूर, रईस-उल-वज्रा किंवा अफगाणिस्तानचे नवे प्रमुख म्हणून प्रस्तावित केले आहे. तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने द न्यूजला सांगितले की, मुल्ला बरादर अखुंड आणि मुल्ला अब्दुस सलाम हे त्यांचे डेप्युटी म्हणून काम करतील. अनेक तालिबान नेत्यांशी बोलताना मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शविल्याचा दावा देखील करण्यात आला आहे आहे.

Afghanistan Government: Mullah Hasan Akhund will be a head of Afghanistan
तालिबानने पाकिस्तानला खडसावले,अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात पडू नका

मोहम्मद हसन अखुंद हे 20 वर्षांपासून तालिबानच्या रेहबारी शुराचे प्रमुख आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्कानी नेटवर्कचे सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री तर तालिबान संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला याकूब संरक्षण मंत्री होऊ शकतो.

तालिबानच्या एका नेत्याने सांगितले की मुल्ला हसन 20 वर्षांपासून हिबतुल्लाह अखुंजा यांच्या जवळ होते . तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात अफगाणिस्तानमध्ये महत्त्वाच्या पदांवर होते . मुल्ला मोहम्मद रब्बानी अखुंड जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते परराष्ट्र मंत्री आणि नंतर उपपंतप्रधान होते.

Afghanistan Government: Mullah Hasan Akhund will be a head of Afghanistan
आयएसआय चीफने तालिबानी नेत्याची काबूलमध्ये घेतली भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा

तालिबान सरकारमध्ये कोण काय बनू शकते?

तालिबानने असेही म्हटले आहे की, हक्कानी नेटवर्कचा नेता सिराजुद्दीन हक्कानीला केंद्रीय गृहमंत्री म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. पूर्वेकडील प्रांतांसाठी राज्यपालांना नामांकित करण्यासाठी तो अधिकृत आहे.हे क्षेत्र पक्कीया, पक्तिका, खोस्त, गार्डगे, नंगरहार आणि कुनार आहेत. त्याचप्रमाणे तालिबानचे संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर यांचा मुलगा मुल्ला याकूबला अफगाणिस्तानचे नवे संरक्षण मंत्री करण्यात आले आहे. मुल्ला याकूब त्याच्या मदरशात शेख हिबतुल्ला अखुंजादाचा विद्यार्थी होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com