तालिबान सरकारची उद्या घोषणा, कोण होणार पंतप्रधान ?
Afghanistan Government will be declare on FridayDainik Gomantak

तालिबान सरकारची उद्या घोषणा, कोण होणार पंतप्रधान ?

अफगाणिस्तानमध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचे (Afghanistan Government) नेतृत्व तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा करतील हे देखील तालिबांकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) नवीन सरकारबाबत (Afghanistan Government)आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचे नेतृत्व तालिबानचे (Taliban) सर्वोच्च नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा (Mullah Hibatullah Akhundzada )करतील हे देखील तालिबांकडून स्पष्ट करण्यात आले आहे . एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, नवीन सरकारमध्ये एक पंतप्रधान (Afghan Prime Minister ) देखील असणार आहेत. त्याचवेळी, आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, तालिबानने म्हटले आहे की काबूलमध्ये (Kabul) भविष्यातील सरकारच्या व्यवस्थेसाठी करार झाले आहेत. नवीन सरकार लवकरच जाहीर होईल. खामा न्यूज एजन्सीनुसार, आयईए प्रमुख मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली हे करार करण्यात आले आहेत.(Afghanistan Government will be declare on Friday)

Afghanistan Government will be declare on Friday
कतारचा जगाला इशारा; तालिबानला वेगळे पाडल्यास अस्थिरता वाढेल

शुक्रवारी स्थापन होणार तालिबान सरकार

टोलो न्यूजनुसार, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य आमुल्ला सामंगानी सांगितले आहे की , "तालिबानचा नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा नवीन सरकारचा नेता असेल." त्याबद्दल शंका नसावी. आम्ही जाहीर करणारं नवीन इस्लामी सरकार लोकांसाठी आदर्श असेल."

तर स्पुतनिक या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबान शुक्रवार, 3 सप्टेंबर रोजी नवीन सरकार स्थापनेची घोषणा करेल. मात्र अजूनही तालिबानच्या राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही.

तालिबानचा कारभार इराणसारखा

अलीकडेच कंधारमध्ये तालिबानच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. असे मानले जाते की अफगाणिस्तानातही इराणसारखी शासन व्यवस्था असेल. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष असू शकतात, परंतु सरकारचे खरे प्रमुख सर्वोच्च नेते असतात.सध्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आहेत. खामेनीप्रमाणेच तालिबानमधील अखुंदजादाला रहबर हा तालिबानचा प्रमुख नेता होऊ शकत.

Afghanistan Government will be declare on Friday
तालिबानचा मोठा दावा; पंजशीरमधील शुतार जिल्ह्यावर केला काब्जा

बरदार तालिबानचे पंतप्रधान होण्याची शक्यता

नवीन सरकारमधील पंतप्रधानांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार यांची तालिबानच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती होऊ शकते. बरदार तालिबानच्या वतीने अमेरिकेबरोबर वाटाघाटी करत होते. किवा त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मावलवी मुहम्मद याकोबलाही नव्या सरकारमध्ये सर्वोच्च पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच तालिबानचा प्रभावशाली नेता सिराजुद्दीन हक्कानीला सरकारमध्ये मोठे पद मिळेल असे बोलले जात आहे. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई आणि अब्दुल्ला यांना तालिबान सरकारमध्ये स्थान मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतरही दोन्ही नेते अजूनही काबूलमध्ये आहेत आणि तालिबानसोबत नवीन सरकारबाबत चर्चा करत आहेत.

तालिबानचे प्रवक्ते आणि माहिती आणि संस्कृतीचे कार्यवाहक मंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले आहे की मागील सरकारमधील लोकांना अफगाणिस्तानच्या नवीन सरकारमध्ये समाविष्ट केले जाणार नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com