प्रेषित मुहम्मद यांच्या 'अपमानाचा' हा सूड: काबूलवरील हल्ल्याचा ISIS ने केला दावा

काबूल येथील गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे.
प्रेषित मुहम्मद यांच्या 'अपमानाचा' हा सूड: काबूलवरील हल्ल्याचा ISIS ने केला दावा
AfghanistanDainik Gomantak

ISIS Claims Kabul Gurdwara Attack​: काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. त्याचवेळी, ISIS ने प्रेषित मुहम्मद यांच्या 'अपमानाचा' बदला घेतल्याचे म्हटले आहे. प्रेषित मुहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर देशातील आणि जगाच्या अनेक भागांमध्ये मुस्लिम समुदायातील लोकांकडून निषेध व्यक्त होत आहे. दुसरीकडे, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने 5 जून रोजी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. (afghanistan isis claims attack on gurudwara in kabul it was retaliation for insults to prophet muhammed)

दरम्यान, ISIS ने आपल्या अमाक साइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'शनिवारच्या हल्ल्यात हिंदू, शीख आणि "धर्मविरोधी" यांना लक्ष्य केले गेले.' काबूलमधील गुरुद्वारावर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी (Terrorists) हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रामुख्याने मशीनगन आणि ग्रेनेड्सचा वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी सांगितले की, 'हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये प्रवेश करताच एक ग्रेनेड फेकले आणि आग लावली.'

Afghanistan
Taliban In Afghanistan: तालिबान महिलांच्या हक्कांवर पुन्हा अंकुश

दुसरीकडे, नुकतेच भारतीय शिष्टमंडळ आणि तालिबान शिष्टमंडळ यांची काबूलमध्ये भेट झाली. यादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, 'भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणांना भेट देणार आहे. जिथे भारत समर्थित प्रकल्प राबवले जात आहेत.' त्याचवेळी तालिबानने भारताला विनंती केली की, 'अफगाणिस्तानसोबत (Afghanistan) पुन्हा नव्याने व्यापार सुरु करण्याचा विचार करावा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com