Talibanचे नवे फर्मान.. आधी मुलींच्या शिक्षणावर बंदी अन् आता .....जगभरातून निषेध

Afghanistan News: आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या महिलांना कामाकरुन कमी करण्यासाठी नोटिफिकेशन काढलंय.
Talibans |Afghanistan Women Education | Afghanistan News
Talibans |Afghanistan Women Education | Afghanistan NewsDainik Gomantak

Afghanistan Women Education : अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून तालिबान्यांनी आपली सत्ता गाजवण्यास सुरुवात केला आहे. सर्वात पहिले त्यांनी सर्वात महिलांना आणि विद्यार्थिनींना टार्गेट केलं आहे. महिलांवर एकापोठापाठ एक असे निर्बंध आणले आहेत. त्यांच्या एकटं फिरण्यावर ब्रेक लावला त्यानंतर त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांना बंद केलं.

त्यानंतर तालिबानी सरकराने महाविद्यालयांमध्ये मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणले आहेत. त्याविरोधात देशव्यापी आंदोलनं देखील झाली अनेक देशांमध्ये तालिबानी निर्णयाचा निषेध केला. पण त्याचा फार फायदा झाला नाही. उलट तालिबान्यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर गोळीबार केला. आता यामध्ये आणखी दोन मोठ्या गोष्टींची भर पडली आहे.

एक म्हणजे मुलींच्या उच्च माध्यमिक शिक्षणावर बंदी घातली फक्त सरकारी विद्यापीठातच नाही. तर खासगी विद्यापिठातही मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणले त्याचा विरोध सुरु झाला. विद्यापिठांसमोर विद्यार्थिनींना आंदोलनं सुरु केली. तर त्यांनाच तालिबान्यांनी मारपीट केली. आंदोलन चिरडून टाण्यासाठी गोळीबारही केली. काही जणांना अटकही केली.

Talibans |Afghanistan Women Education | Afghanistan News
Russia-Ukraine War: युक्रेनच्या 'या' मागणीने पुतिन यांना टेन्शन

तालिबानच्या निर्णयामुळे देशात आधीच दहशत असताना त्याने आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या महिलांना कामाकरुन कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे आता ना शिक्षण...ना नोकरी..ना स्वातंत्र्य... ही अवस्था येथील महिलांची झाली आहे.

तालिबान्यांच्या या निर्णयानंतर हॅशटॅश लेट हर लर्न... ग्लोबली ट्रेण्ड होऊ लागला आहे. अमेरिकेसह (America) अनेक देशांकडून यावर प्रतिक्रियाही आली आहे. येथील महिलांनी (Womenअनेक देशांकडे मदतीसाठी विनंती देखील केली आहे. कोणता देश यासाठी पुढाकार घेणार याकडेही अवघ्या जगाचं लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com