तालिबानच्या निर्बंधामुळे अफगाणिस्तानचा एकमेव स्पोर्ट्स चॅनलही झाला बंद

तालिबानच्या (Taliban) निर्बंधांव्यतिरिक्त, अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती देखील हा चॅनेल बंद होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
तालिबानच्या निर्बंधामुळे अफगाणिस्तानचा एकमेव स्पोर्ट्स चॅनलही झाला बंद
TalibanDainik Gomantak

तालिबान्यांनी (Taliban) लादलेल्या निर्बंधांचा सामना करणारी अफगाणिस्तानची (Afghanistan) एकमेव क्रीडा वाहिनी (Sports Channel) देखील बंद करण्यात आली. टोलो न्यूजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, तालिबानच्या निर्बंधांव्यतिरिक्त, अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती देखील हा चॅनेल बंद होण्याचे एक प्रमुख कारण आहे. चॅनेलचे प्रमुख शफिकुल्लाह सलीम पोया (Shafiqullah Salim Poya) म्हणाले, "चॅनेलचे प्रसारण थांबवण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रसारमाध्यमांवर, विशेषत: 3 स्पोर्ट्स चॅनेलवर लादलेली बंदी. अफगाण माध्यमे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आघाडीवर समस्यांना तोंड देत आहेत.

पायो पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानच्या पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, काही आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानमधील सुमारे 150 मीडिया हाऊसेस बंद करण्यात आली आहेत. याचे मुख्य कारण आर्थिक आणि राजकीय संकट होते.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर उल जुलूल निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यांच्या निर्णयांचा खेळांवरही परिणाम होत आहे. ते आधीच खेळामध्ये महिलांच्या सहभागाच्या विरोधात आहे. विशेष म्हणजे स्टेडियममध्ये महिला प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानकडून सांगण्यात आले आहे की, आयपीएलमध्ये इस्लामिक विरोधी सामग्री दाखविण्यात येत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

Taliban
Kabul Blast: अफगाणिस्तान हादरलं, 12 जणांचा मृत्यू

अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणखी काही निर्बंध लादताना पत्रकार संघटनांसाठी 11 नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार इस्लामच्या विरोधात सामग्री प्रकाशित करण्यावर बंदी आहे. राष्ट्रीय महापुरुषांच्या विरोधात अपमानास्पद साहित्याच्या प्रकाशनावरही बंदी घालण्यात आली आहे. पत्रकारांना त्यांचे अहवाल शासकीय माध्यम कार्यालयाला कळवण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर तालिबान्यांनी खाजगी टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या आशयामध्येही बदल करण्यास सांगितले आहे. महत्त्वाच्या बातम्या बुलेटिन, राजकीय वादविवाद, मनोरंज, मैफिली आणि परदेशी नाटकांची जागा तालिबान सरकारला अनुरुप असलेल्या कार्यक्रमांनी घेतली आहे. दरम्यान, कमेटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (सीपीजे) ने तालिबानला अफगाणिस्तानात पत्रकारांना ताब्यात घेणे त्वरित थांबवावे आणि मीडियाला बदलाच्या भीतीशिवाय मुक्तपणे काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.