South Africa: दक्षिण आफ्रिकेतला अजब नियम, एकाचवेळी 100 बायका ...

South Africa: त्याच्या सर्व बायका उच्चशिक्षित असून त्या जगातील अनेक भाषांमध्ये बोलू शकतात. आफ्रिकेतील राजे तेथील संस्कृती आणि जमीन टिकवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतात.
South Africa
South AfricaDainik Gomantak

South Africa: भारतात एकाचवेळी एकापेक्षा जास्त लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेत असा काही नियम आहे जो अजब वाटू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या एका राजाला 100 बायका आणि 500 मुलं आहेत.

अबुम्बी -दुसरा हे या आफ्रिकन राजाचे नाव आहे. कॅमेरूनमध्ये एकापेक्षा जास्त बायका असणे कायदेशीर असून पुरुष किती लग्न करु शकतो यावर या देशात मर्यादा नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे एका राजाचे निधन झाले तर त्याच्या बायका आपोआप नवीन राजाच्या बायका होतात असा तिथला नियम आहे. पहिल्या राजाच्या मृत्यूनंतर अबुम्बी (दुसरा) सत्तेवर आला.

त्यानंतर तो आपोआप 72 बायकांचा नवरा झाला. त्याच्या सर्व बायका उच्चशिक्षित असून त्या जगातील अनेक भाषांमध्ये बोलू शकतात. आफ्रिके( Africa )तील राजे तेथील संस्कृती आणि जमीन टिकवण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतात. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल आहेत. त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियादेखील देताना दिसत आहेत.

South Africa
Pakistan: 'वाटलं तर गवताच्या भाकरी खाऊ...' भुट्टोचे ते विधान आणि आज मुठभर पीठासाठी पाकमध्ये मारामारी

दरम्यान, अबुम्बी -दुसरा या राजाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर 'इथं एक मुलगी मिळायची पंचायत झाली अन् याने 100 बायका केल्या' अशा कंमेट्स नेटकरी देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com