बायडन यांच्या वक्तव्यानंतर रशियाने राजदूताला मायदेशी बोलवलं

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने घोषीत केले की, नॅव्हेली यांना विष दिल्याबद्दल शिक्षा म्हणून रशियावर लादलेले निर्बंध अत्यंत कठोर होते.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी व्लादिमीर पुतीन यांना निवडणूकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ‘’किंमत मोजावी लागणार’’ असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर रशियाने बुधवारी अमेरिकेत असणाऱ्या आपल्या राजदूताला परत माघारी बोलावून घेतले आहे. सल्लामसलत करण्यासाठी बोलवले असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणूकीमुळे अमेरिकेत राजकीय तणाव निर्माण झाला होता.

बायडन यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या गुप्तचर अहवालाविषयी विचारण्यात आले होते. यामध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत करण्य़ासाठी आणि निर्वाचित अध्यक्ष बायडन यांना हानी पोहचवण्य़ासाठी प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘’त्यांना योग्य ती किंमत मोजावी लागणार’’ असं बायडन यांनी सांगितले होते.

अमेरिकेत स्पा मध्ये झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू 

रशियामधील विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हेली आणि त्यांच्या इतर प्रतिस्पर्ध्यांना विष दिल्याच्या आरोपाखाली पुतीन दोषी आहेत का असं बायडन यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, ‘’हो मी त्यांना दोषी मानतो.’’ अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने घोषीत केले की, नॅव्हेली यांना विष दिल्याबद्दल शिक्षा म्हणून रशियावर लादलेले निर्बंध अत्यंत कठोर होते. यालाच प्रत्युत्तर दाखल रशियाने आपल्या राजदूताला माघारी मायदेशी बोलावून घेतले. काही अपरिवर्तनीय प्रकारचे बदल होऊ नये यासाठी भर दिला आहे. 

यावर रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, वॉशिंग्टनमधील राजदूत एनाटोली अटोनोव्ह यांना अमेरिकेबरोबरच्या संबंधाच्या संदर्भात काय केले पाहिजे याचे विश्लेषण करण्यासाठी बोलावून घेतले आहे. तर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी आरआयए नोव्हेस्ती यांना सांगितले की, रशिय़ा-अमेरिकेचे संबंध बिघडण्याची पूर्णपणे जबाबदारी अमेरिकेवर अवलंबून असणार आहे.
 

संबंधित बातम्या