कोरोनानंतर या धोक्यांमुळे येणार मानवजातीवर संकट; बिल गेट्स यांनी दिला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जगाला आगामी काळात येणाऱ्या दोन धोक्यांविषयी इशारा दिला आहे.

न्यूयॉर्क :  मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जगाला आगामी काळात येणाऱ्या दोन धोक्यांविषयी इशारा दिला आहे. आगामी काळात हवामान बदल आणि जैव-दहशतवादामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. या गोष्टी त्यांनी एका यूट्यूब कार्यक्रमात सांगितल्या. पाच वर्षांपूर्वीदेखील त्यांनी जगाला कोरोना विषाणूसाख्या साथीच्या रोगाचा इशारा दिला होता. आगामी काळात विषाणू येईल, या भीतीने लोक बाजारात जायला घाबरतील, फ्लाइटमध्ये चढण्यास घाबरतील, असं ते म्हणाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप नव्हे, तर हे बनलं सगळ्यात जास्त डाऊनलोड होणारं अ‍ॅप

बिल गेट्स म्हणाले, "येत्या काही वर्षांत, महामारीपेक्षा प्रत्येक वर्षी हवामान बदलामुळे जास्त लोक मरण पावतील. याशिवाय दहशतवादाचा धोकाही जगभर फिरत आहे. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा या दोन गोष्टी जगभरात विनाश आणू शकतात." गेट यांनी या कार्यक्रमात असेही म्हटले आहे , की जगात कोणताही साथीचा रोग रोखला जाऊ शकत नाही. त्याऐवजी, त्यास सामोरे जाण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. श्वसनाच्या आजारांना निमंत्रण देणारे विषाणू अत्यंत धोकादायक आहेत. 

'लडाख संदर्भात चीन सोबत चर्चा हवी' 

बर्‍याच वेळा असे संसर्ग झाल्याचे कळतदेखील नाही, तर इबोलासारख्या संसर्गात, तो माणूस इतका आजारी पडतो की त्याला थेट इस्पितळात दाखल केले जाते. हवामान बदल आणि जैव-दहशतवादामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, ही भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टच्या संस्थापक काही दिवसांपूर्वीच 'व्हेरिटासियम' हा युट्यूब चॅनल चालवणाऱ्या डेरेक म्युलरशी बोलताना केली होती.बिल गेट्स यांनी सहा वर्षांपूर्वीच कोरोनासारखा विषाणू येण्याचा अंदाज वर्तविला होता.

संबंधित बातम्या