श्रीलंकेच्या समुद्रकिनार्‍यावर शंभराहून अधिक कासव, डॉल्फिन आणि ब्लू व्हेल मासे मृतावस्थेत सापडले
turtles

श्रीलंकेच्या समुद्रकिनार्‍यावर शंभराहून अधिक कासव, डॉल्फिन आणि ब्लू व्हेल मासे मृतावस्थेत सापडले

श्रीलंकेच्या समुद्री(Sri Lanka) भागात मालवाहू जहाज(Ship) जळून बुडाल्यानंतर पाण्यात विष विरघळले आहे. यामुळे समुद्री प्राण्यांचे आयुष्य संपुष्टात आले आहे. आतापर्यंत समुद्रकिनार्‍यावर शंभराहून अधिक कासव, काही डॉल्फिन आणि ब्लू व्हेल मासे मृतावस्थेत सापडले आहेत. आणि आणखी समुद्री प्राण्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.(After Fire Ship More than 100 turtles dolphins and blue whales found dead off Sri Lankan coast)

पर्यावरणशास्त्रज्ञांचा असा दावा केला आहे की, जलीय जीवांच्या मृत्यू जहाजावर लागलेल्या आगीमुळे आणि त्यातून निघालेले धोकादायक रसायने पाण्यात विरघळल्याने झाला आहे. सिंगापूर ध्वजांकित एक्सप्रेस पर्ल जहाजात 12 दिवस आग लागत होती. गेल्या आठवड्यात कोलंबोच्या मुख्य बंदराजवळ हे जहाज बुडाले होते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जलचर जीवनाशी संबंधित या कारणांची तात्पुरती चौकशी केली गेली आहे आणि अद्याप कसून चौकशी होणे बाकी आहे.

रसायनांमुळे आयुष्य संकटात सापडले 

20 मे रोजी या जहाजात आग लागली होती. काही दिवसांनंतर मृत जलचर प्राणी समुद्रकिनारी येऊ लागले. कासव संवर्धन प्रकल्पाच्या तुषान कापुरूसिंघे यांनीही कासवांच्या मृत्यूला जहाजातील आग आणि रसायने जबाबदार असल्याचे कारण दिले आहे. श्रीलंकेच्या समुद्री भागात कासवांच्या पाच प्रजाती आढळतात, बहुतेक वेळा ते अंडे देण्यासाठी किनाऱ्याजवळ येतात. मार्च आणि जून दरम्यान कासव मोठ्या संख्येने किनाऱ्याजवळ येतात.

रासायनामुळे लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर 1500 कंटेनरपैकी किमान 81 कंटेनरमध्ये धोकादायक माल होता. श्रीलंकेच्या नौदलाचा असा विश्वास आहे की केमिकल कार्गोमुळे या जहाजाला आग लागली. आगीत बहुतेक रसायने नष्ट झाली, परंतु फायबरग्लास आणि कीतीतरी टन प्लास्टिकमुळे  समुद्रामध्ये बर्‍याच प्रमाणात प्रदूषण झाले. त्याचा प्रभाव देशातील लोकप्रिय समुद्रकिनार्‍यावर भविष्यात दिसून येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

400 मृत कासव सापडले

या मृत्यूमागे दोन कारणे असू शकतात असे पर्यावरण मंत्रालयाचे सचिव अनिल जयसिंगे यांचे म्हणणे आहे. एक उष्णतेमुळे या प्राण्यांचा मृत्यू झाला असेल आणि दुसरे रसायनामुळे. या प्राण्यांचा पोस्टमॉर्टम अहवाल येणे अद्याप बाकी आहे. आतापर्यंत समुद्रकिनार्‍यावर कमीतकमी 400 मृत कासव सापडले आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com