भारतानंतर आता इराणने देखील पाकिस्तानवर केली सर्जिकल स्ट्राईक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एक मोठी गुप्तहेर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.

दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एक मोठी गुप्तहेर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या सैन्य दलातील रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) पाकिस्तानच्या भूमीवर प्रवेश करत जोरदार सर्जिकल स्ट्राईक केला आहे. इराणने पाकिस्तानच्या सीमेत घुसून केलेल्या या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा समोर आलेला नसला तरी, इराणने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तावडीतून आपल्या दोन सैनिकांची सहीसलामत सुटला केली असल्याचे समजते. 

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने मंगळवारी 2 फेब्रुवारी रोजी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून गुप्तचर कारवाई केली आहे. इराणच्या जवानांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात प्रवेश करत, जैश अल-अडल या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून दोन सैनिकांची सुटका केली असल्याचे इराणच्या सैन्य दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या दहशतवादी संघटनेने 2018 मध्ये इराणच्या या सैनिकांचे अपहरण केले होते.  

भारताच्या राफेलचा चीनने घेतला धसका

इराणच्या सैन्य दलाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, पाकिस्तानातील कट्टरपंथी वहाबी दहशतवादी संघटना जैश अल-अडलने 16 ऑक्टोबर 2018 रोजी इराणच्या बारा रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे अपहरण केले होते. व त्यांना दोन्ही देशांमधील सीस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील मेरकावा शहरात ठेवले होते. यातील पाच सैनिकांना नोव्हेंबर 2018 मध्ये सोडण्यात आले होते. तर अन्य चार जणांना पाकिस्तानच्या सैनिकांनी कारवाई करत सुटका केल्याची माहिती इराणच्या सैन्य दलाने दिली आहे. आणि यातील दोन सैनिकांना इराणने मंगळवारी कारवाई करत या सैनिकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे सैन्य दलाने पुढे सांगितले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानच्या भूमीवर प्रवेश करत दहशतवादी गटावर सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण आता जगातील तिसरा देश बनला आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला होता. भारताने एक नाही तर दोन वेळेस पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती. त्यानंतर अमेरिकेने देखील अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे स्ट्राईक केला होता. आणि त्यावेळी अमेरिकेने त्यांच्या मारिन कमांडो नेव्ही सील्सचा वापर केला होता.          

संबंधित बातम्या