Pakistan: पेशावर हल्ल्यानंतर PAK चे संरक्षण मंत्री म्हणाले, 'भारतात नमाजाच्या वेळी...!

Pakistan Defense Minister Khawaja Asif: या हल्ल्याच्या भीषणतेवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना संकटाच्या वेळी एकत्र येण्याचे अवाहन केले आहे.
Pakistan Defense Minister Khawaja Asif
Pakistan Defense Minister Khawaja Asif Twitter/ @ani_digital

Pakistan Defense Minister Khawaja Asif on India: पाकिस्तानातील पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. नमाजाच्या वेळी पेशावरमधील मशिदीवर झालेला आत्मघातकी हल्ला हा सर्वात अलीकडील हल्ला आहे, ज्यात 100 हून अधिक लोक मारले गेले.

या हल्ल्याच्या भीषणतेवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना संकटाच्या वेळी एकत्र येण्याचे अवाहन केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला झाला, भारतात असे कधीच होत नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. पाकचे संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, भारतात (India) नमाजाच्या वेळी कधीही श्रध्दाळूंची हत्या केली जात नाही.

Pakistan Defense Minister Khawaja Asif
Pakistan Economic Crisis: कर्जाच्या गर्तेत दबलेल्या कंगाल पाकिस्तानचा POK बाबत मोठा निर्णय!

संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, ' देशात मशिदींमध्ये नमाजाच्या वेळीही आत्मघाती हल्ले होऊ लागले आहेत. मात्र, भारत आणि इस्रायलसारख्या देशात अशाप्रकारचे आत्मघातकी हल्ले कधी झाले नाहीत.'

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ खान पुढे म्हणाले की, केवळ एका पंथाला किंवा समाजातील एका वर्गालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लक्ष्य करणाऱ्या या दहशतवाद्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

Pakistan Defense Minister Khawaja Asif
Pakistan Bus Accident: बलुचिस्तानमध्ये बस दरीत कोसळून 40 प्रवासी ठार

संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी झालेल्या चर्चेत ख्वाजा आसिफ यांना दहशतवाद्यांविरोधात (Terrorists) लष्कराच्या नव्या ऑपरेशनबद्दल विचारण्यात आले, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी नव्याने लष्करी कारवाई सुरु करण्याचा निर्णय उच्चस्तरीय अधिकारी घेतील.

ते पुढे म्हणाले की, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीचा आहे. अशा गोष्टींचा निर्णय अशा मंचावर होऊ शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com