New Zealand: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर टळला त्सुनामीचा धोका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

त्तर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते, आता ते त्यांच्या घरी परतू शकतात. मात्र अद्याप धोका पूर्णपणे टळला नाही

न्यूझीलंडचा भूकंप त्सुनामीचा धोका: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर आता त्सुनामीचा धोका टळला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. उत्तर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते, आता ते त्यांच्या घरी परतू शकतात. मात्र अद्याप धोका पूर्णपणे टळला नाही आणि लोकांना किनारपट्टी व समुद्रकाठापासून दूर राहण्यास सांगितले गेले असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूझीलंडची राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'यापुढे पूर येण्याचा धोका नाही. आम्ही लोकांना पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत. समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी किनारी भागाकडे जाऊ नका. खरं तर, न्यूझीलंडमधील करमाडेक बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप 8.1 रिश्टर स्केल होता. या भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तसेच, धोक्याच्या ठिकाणी लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

तीन वेळा झाला भूकंप

न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के एकामागून एक असे तीन वेळा धक्के जाणवले. पहिल्यांदा 7.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि दुसऱ्यांदा 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्यानंतर त्सुनामीच्या भीतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. मात्र आता लोकांना परत जाण्यास सांगण्यात आले आहे. परंतु यादरम्यान, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा कुठल्याही इमारतीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

रेलटेलकडून 4000 रेल्वे स्थानकांवर प्रीपेड वाय-फाय सेवा सुरू; ग्राहकांना मिळणार हाय-स्पीड इंटरनेट 

संबंधित बातम्या