Harvard Research Study: वृद्धांना पुन्हा येणार तरुणपण, हार्वर्डच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या नवीन संशोधनामुळे वृद्ध आणि कमकुवत दृष्टी असलेल्या उंदरांना पुन्हा तरुण बनवण्यात यश आले आहे.
Harvard Research Study
Harvard Research StudyDainik Gomantak

New Study How To Look Younger: तरुण दिसण्यासाठी जगभरातील मार्केट सौंदर्यप्रसाधने आणि सुंदर दिसण्यासाठी लागणाऱ्या कॅप्सूलने भरलेली आहे. जे लोक काही दिवसांत तरुण दिसण्याचा दावा करतात. त्यांचा प्रभाव फारसा नसला तरी वृद्ध लोकांमध्ये तरुणपण आणण्यासाठी वैज्ञानिक दीर्घकाळ प्रयोग करत होते.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या या संशोधनावर विश्वास ठेवला, तर कदाचित काही काळानंतर 50 वर्षांच्या माणसालाही 30 वर्षांच्या तरुणाइतकी त्वचा (Skin) चमकदार वाटेल.

बोस्टन प्रयोगशाळेत वृद्ध आणि कमकुवत दृष्टी असलेल्या उंदरांना निरोगी आरोग्य दिले. वयोमानामुळे कमजोर झालेली दृष्टी देखील चांगली झाली. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि बोस्टन विद्यापीठाच्या या संयुक्त संशोधनाला सेल या वैज्ञानिक जर्नलमध्ये स्थान मिळाले आहे.

या संदर्भात संशोधक डेव्हिड सिंक्लेअर यांनी स्पष्टपणे सांगितले की वय ही एक रिवर्जिबल करता येणारी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये बदल करता येउ शकतो.

लॉस ऑफ एपिजेनेटिक इंफॉर्मेशन एज कॉज ऑफ मैमेलियन एजिंग असे सेलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाचे नाव आहे.

प्रयोगशाळेतील उंदरांवर केलेल्या या प्रयोगात त्यांना तरुण बनवता येते, हे स्पष्टपणे दिसून आले. एक धक्कादायक बाब अशीही पाहायला मिळाली की, तरुणपण देता येते आणि वृध्दत्वपण आणता येते.

Harvard Research Study
China: सुट्टीच्या कालावधीत दरदिवशी 36000 कोरोणारुग्णांचा मृत्यू होण्याचा अंदाज

शरीरात तरुणपणाची बॅकअप कॉपी असते. या संकल्पनेवर संशोधन सुरू झाले. ही कॉपी ट्रिगर झाल्यास, पेशी पुन्हा निर्माण होण्यास सुरवात करतील आणि तरुणपण परत येण्यास सुरवात होईल.

या प्रयोगाचा समजही चुकीचा ठरला की वृद्धत्व हे जनुकीय उत्परिवर्तनाचा परिणाम आहे, ज्यामुळे डीएनए कमकुवत होतो. किंवा कमकुवत झालेल्या पेशी काळाबरोबर शरीराला खूप कमकुवत बनवतात.

संशोधक सिनक्लेअरचा असा विश्वास होता की, वृद्धत्व हे खरं तर पेशींना स्वतःचा डीएनए नीट वाचता येत नसल्याचा परिणाम आहे. जुन्या आणि सैल घटकांसह मशीनवरील सॉफ्टवेअर खराब झाल्यास हे अगदी सारखेच आहे.

जवळजवळ वर्षभर चाललेल्या संशोधनादरम्यान जुन्या आणि कमकुवत दृष्टी असलेल्या उंदरांमध्ये मानवी प्रौढ त्वचेच्या (Skin) पेशी घातल्या गेल्या, ज्यामुळे ते काही दिवसात पुन्हा पाहू शकले. यानंतर मेंदू, स्नायू आणि किडनीच्या पेशीही अशाच प्रकारे तरुणांमध्ये आणल्या जाऊ शकतात.

जवळपास वर्षभर चाललेल्या या संशोधनात नमुन्याचे क्षेत्रफळ फार मोठे नसले तरी, म्हणजे अगदी लहान गटावर संशोधन करण्यात आले होते, त्यामुळे शास्त्रज्ञ उत्साहित असूनही, ही प्रक्रिया तितकीच परिणामकारक ठरेल याची त्यांना खात्री नाही.

2022 च्या एप्रिलमध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी असाच दावा केला होता. त्यांचा दावा अधिक स्पष्ट होता, त्यानुसार वय 30 वर्षे मागे घेता येते. संशोधनासाठी, त्वचेच्या पेशींचे पुनर्प्रोग्राम केले गेले जेणेकरुन ते वर्षानुवर्षे मागे जाऊ शकतील.

वृद्धत्वाच्या पेशींमध्ये, ते कोलेजन तयार करण्याची क्षमता वाढवते, जे प्रथिने आहे ज्यामुळे शरीर मजबूत आणि तरुण वाटते. मल्टी-ओमिक रिजुवेनेशन ऑफ ह्युमन सेल या नावाने हे संशोधन इलाइफ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधन किती लोकांवर झाले यापेक्षा अधिक माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com