अहमद मसूदचा मोठा दावा, एनआरएफने पाकिस्तानचे लढाऊ विमान पंजशीरमध्ये पाडले

परंतु ज्याप्रकारे पाकिस्तानचे अधिकारी तालिबानशी (Taliban) भेटत आहेत, ते तालिबानला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अहमद मसूदचा मोठा दावा, एनआरएफने पाकिस्तानचे लढाऊ विमान पंजशीरमध्ये पाडले
Ahmad MassoudDainik Gomantak

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पंजशीर प्रांतात तालिबानशी (Taliban) लढणाऱ्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचे (एनआरएफ) नेते अहमद मसूद (Ahmad Massoud) यांनी पाकिस्तानचे जेट पाडल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तानी जेट विमान, एनआरएफने पाडले आहे. प्रतिकार पंजशीर.' यापूर्वी अशी बातमी आली होती की, पाकिस्तानने पंजशीरमध्ये ड्रोनने हवाई हल्ले केले आहेत.

तालिबानने पंजशीर प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. आता पाकिस्तान पंजशीरमध्ये सुरु असलेल्या लढाईत तालिबानलाही पाठिंबा देत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी ड्रोनने पंजशीरवर हल्ला केला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी रेझिस्टन्स फ्रंटच्या नेत्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रविवारी हे हल्ले करण्यात आले. तथापि, तालिबानने मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. (Pakistan Helps Taliban). परंतु ज्याप्रकारे पाकिस्तानचे अधिकारी तालिबानशी भेटत आहेत, ते तालिबानला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Ahmad Massoud
UNSC मध्ये अफगाणिस्तान ठरावावर मतदानासाठी चीन, रशियाची अनुपस्थित

अहमद मसूदने पाकिस्तानवर टीका केली

अहमद मसूदने फेसबुकवर एक ऑडिओ संदेश जारी करताना तालिबानचे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले असून, आम्ही पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने तालिबानला फहीम दष्टीला यांना मारण्यास मदत केली आहे. पाकिस्तान थेट पंजशीरमध्ये अफगाणांवर हल्ला करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय समुदाय मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तालिबान लढाऊ पाकिस्तानच्या मदतीने हल्ले करत आहेत.

Ahmad Massoud
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे

तालिबान आणि एनआरएफकडूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. तालिबानने पंजशीरला पूर्णपणे काबीज केल्याचे म्हटले असताना, दुसरीकडे अहमद मसूदने सांगितले की, एनआरएफ अजूनही पंजशीरमध्ये महत्त्वाचे धोरणात्मक स्थान राखून आहे. ते म्हणाले की त्यांचे सेनानी पंजशीरमध्ये आहेत आणि तालिबानशी युद्ध लढत आहेत. मसूद म्हणाला की आम्ही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार आहोत. तालिबानशी लढण्यासाठी देशातील जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र आले पाहिजे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com