2 कप चहा कमी प्या अन् पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवा; मंत्र्यांचं आवाहन

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
2 कप चहा कमी प्या अन् पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवा; मंत्र्यांचं आवाहन
Ahsan IqbalDainik Gomantak

पाकिस्तान आणि अर्थिक विवंचना हे समिकरण बदलण्यास तयार नाही. नागरिकांसाठी दुरावत चाललेले रोजागाराचे मार्ग. यातून वाढत असलेली बेरोजगारी आणि भुकबळीची संख्या हे प्रश्न संपायला तयार नाहीत. यात पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संदर्भात पाकिस्तानचे मंत्री अहसान इक्बाल यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

(Ahsan Iqbal Former Minister for Interior of Pakistan said Drink less than 2 cups of tea to save Pakistan economy )

मंत्री अहसान इक्बाल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान सद्या अर्थिक विवंचनेतून जात आहे. त्यामूळे देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी मी लोकांना आवाहन करेन की दिवसभरात दोन कप चहा कमी प्या, त्यामुळे आयात बिल कमी होईल. सध्या आपण कर्ज घेऊन चहा आयात करत आहे. तसेच वीज वाचवण्यासाठी व्यापारी साडेआठ वाजता दुकाने बंद करू शकतात असंही त्यांनी म्हटलं.

Ahsan Iqbal
कोण आहे आरती प्रभाकर, ज्यांना जो बायडेन बनवणार आपली विज्ञान सल्लागार

जगात जास्त चहा आयात करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. गतवर्षी 600 मिलियन डॉलरहून जास्त किंमतीच्या चहाची खरेदी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तान सर्वाधिक चहा केनियातून मागवतो. त्यासाठी त्यांना परदेशी चलनाची गरज पडते. मात्र सध्या त्यांच्याकडी परकिय चलनाचा तुटवडा आहे.

Ahsan Iqbal
Russia-Ukraine War: युक्रेनचे सेवेरोडोनेत्स्क शहर रशियाच्या ताब्यात जाणार

यावर उपाय म्हणून चहा कमी पिण्याचं आवाहन केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आणि यावर नागरिक या अहवानावर चर्चा करतायेत. त्यामूळे चहा कमी प्यायल्याने अर्थव्यवस्था रुळावर येणार का ? असा प्रश्न ही पाकिस्तान नागरिकांकडून विचारला जात आहे. पाकिस्तानच्या या प्रश्नावर गांभिर्याने विचार करण्याची गरज असताना मंत्री इक्बाल यांनी केलेला अजब दावा आता पाकिस्तानसह अनेक देशात निव्वळ चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com