"ब्रिटनहून 246 प्रवाशांना घेवून विमान दिल्लीत दाखल"

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली असतानाच ब्रिटनहून 246 प्रवाशांना घेवून एअर इंडियाचं  विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालं.

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली असतानाच ब्रिटनहून 246 प्रवाशांना घेवून एअर इंडियाचं  विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालं.

भारताने कोविडचा धोका ओळखून सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटनसोबतची वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता ब्रिटनबरोबर विमानसेवा पुन्हा एखदा नव्याने पूर्ववत केली आहे.भारतात सध्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची 82 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

केंद्रसरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,प्रत्येक आठवड्याला भारतातून 30 आणि ब्रिटनमधून 30 अशाप्रकारे विमांनाचं उड्डाच होणार असल्याचं केंद्रीय वाहतूक उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे.

ब्रिटनमधून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर प्रवाशांना आपल्या शहरात जाण्यासाठी 10 तासांचा वेळ ठेवण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानावरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवावी अशी विनंती केंद्रसरकारला केली आहे.अथक परिश्रमानंतर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असताना ही बंदी उठवून आपण लोकांचा जीव धोक्यात का घालत आहोत असाही सवाल उपस्थीत केला आहे.

दिल्लीत नव्या स्ट्रेनचे 13 रुग्ण आढळले आहेत.8 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्टचे पैसे स्वता:ला भरावे लागणार आहेत.तसेच प्रवाशांना 72 तास आगोदर कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे.त्याचबरोबर निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशाला दिवसांसाठी क्वारटांइन व्हाव लागणार आहे.

आणखी वाचा:

अ‍ॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागं टाकत, यांनी मिळवला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान -

संबंधित बातम्या