भारतातील हवेचा दर्जा वाईट : डोनाल्ड ट्रम्प

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

३ नोव्हेंबरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या अंतिम चर्चेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील हवेची गुणवत्ता चांगली नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : नोव्हेंबरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या अंतिम चर्चेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील हवेची गुणवत्ता चांगली नसल्याचे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प  आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बिडेन यांनी 
कोरोना विषाणूची साथ, अर्थव्यवस्था, वंशविद्वेष आणि पोलिसांबद्दलच्या तक्रारी, परराष्ट्र धोरण, आरोग्यसेवा आणि हवामान बदलसह अनेक विषयांवर चर्चा केली.

मागील वादविवादापेक्षा  ही चर्चा अधिक शिस्तबद्ध आणि ठोस होती. चर्चेच्या अगोदर आयोजकांनी ट्रम्प आणि बिडेन दोघांनाही प्रत्येक विषयावर उत्तर देण्यासाठी दोन अखंड मिनिटांची मुभा देण्यात आली होती.
हवामान बदलावर भाष्य करताना ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियामधील हवेची गुणवत्ता चांगली नसल्याचे म्हटले आहे.

३ नोव्हेंबरला नवीन अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती निवडून येतील. वंशभेद आणि पोलिसांचे अत्याचार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांशिवाय कोरोना साथीचा मतदानावर जोरदार परिणाम होण्याची शक्यता आहे. 
फ्लोरिडा विद्यापीठाच्या यूएस इलेक्शन प्रोजेक्टच्या म्हणण्यानुसार, २०१६ च्या एकूण मतदानाच्या जास्त, कमीतकमी 35 दशलक्ष लोकांनी आधीच मतदान केले 

संबंधित बातम्या