एअरटेलने सलग तिसर्‍यांदा रिलायन्स जिओला टाकले मागे

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

देशभरातील एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या ऑक्टोबर महिन्यात 1.17 अब्ज झाली आहे. नवीन ग्राहक जोडण्याच्या बाबतीत एअरटेलने सलग तिसर्‍या महिन्यात ऑक्टोबरमध्ये रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. 

नवी दिल्ली:  देशभरातील एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या ऑक्टोबर महिन्यात 1.17 अब्ज झाली आहे. नवीन ग्राहक जोडण्याच्या बाबतीत एअरटेलने सलग तिसर्‍या महिन्यात ऑक्टोबरमध्ये रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये एअरटेलकडे सर्वाधिक वायरलेस ग्राहकांची संख्या 37 लाख आहे. मागील महिन्याच्या तुलनेत हा आकडा 1.12 टक्क्यांनी वाढला आहे. या यादीमध्ये जिओ 22 लाख नवीन ग्राहकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याच व्होडाफोन आयडियाचे नवीन ग्राहक मागील महिन्याच्या तुलनेत ०.9 टक्क्यांनी घसरले आहेत. 

ऑक्टोबरमध्ये एअरटेल आणि जिओच्या तूलनेत व्ही( वोडाफोन आयडीया) मध्ये 2.65 लाख ग्राहकांची घसरण दिसून आली. आक्टोबर च्या तूलनेत मोबाईल पोर्टेबिलिटी रिक्वेस्ट ची संख्या मोठी होती.आणि सप्टेंबर मध्ये ५२० लाख ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट केला आहे.

ट्राय अहवालानुसार, सप्टेंबर 2020 महिन्यात फोन कनेक्शन्सची  संख्या 116.86 कोटी इतकी असलेली ऑक्टोबर महिन्यात ही संख्या वाढून 117.18 कोटी इतकी झाली आहे. सप्टेंबर ट्राय अहवालात असे म्हटले आहे की, देशात मोबाइल कनेक्शनची संख्या वाढून 115.18 कोटी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात जो आकडा दोन कोटींहून अधिक होता. त्यात ऑक्टोबर महिन्यात वायरलाईन किंवा फिक्स्ड लाईन कनेक्शन्सच्या संख्येत घट होऊन 1.99 कोटी झाला आहे.

संबंधित बातम्या