World Bank President Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अजय बंगा यांची बिनविरोध निवड

अमेरिकेसह अनेक बड्या देशांचा पाठिंबा; मे महिन्यात सूत्रे स्वीकारण्याची शक्यता
Ajay Banga | World Bank President
Ajay Banga | World Bank PresidentDainik Gomantak

World Bank New President Ajay Banga: भारतीय-अमेरिकन बिझनेस लीडर अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पदासाठी अन्य कोणीही उमेदवारी न दिल्याने ते एकमेव उमेदवार आहेत.

जागतिक बँकेने सांगितले की, जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी बंगा यांचा एकमेव अर्ज आला आहे. बोर्डाला एक नामांकन प्राप्त झाले आहे. अजय बंगा यांचा या पदासाठी विचार केला जाईल.

निर्धारित प्रक्रियेनुसार, कार्यकारी संचालक मंडळ वॉशिंग्टन डीसीमध्ये उमेदवाराची औपचारिक मुलाखत घेईल आणि त्यानंतर अध्यक्षपदाची निवड पूर्ण होईल."

Ajay Banga | World Bank President
Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना, बोटीला आग लागून 31 जणांचा होरपळून मृत्यू

बँकेने बंगा यांच्या मुलाखतीची वेळ जाहीर केलेली नाही. Mastercard चे माजी प्रमुख असलेले बंगा सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला ते जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारू शकतात.

बंगा यांची बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या प्रमुख दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांपैकी एकाचे प्रमुख होणारे बंगा हे पहिले भारतीय-अमेरिकन आणि शीख-अमेरिकन बनतील.

जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास हे त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जूनमध्ये पायउतार होतील.

Ajay Banga | World Bank President
Elon Musk बनले ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती, बराक ओबामांना सोडले मागे

चार नोबेल विजेत्यांचा पाठिंबा

बंगा यांना भारतासह जगभरातील प्रमुख देशांचा पाठिंबा मिळाला आहे. बंगा यांच्या नामांकनानंतर त्यांनी समर्थनासाठी अनेक देशांचा दौराही केला आहे.

चार नोबेल पारितोषिक विजेत्यांसह 55 वकील, शिक्षणतज्ञ, अधिकारी, दिग्गज आणि माजी सरकारी अधिकारी यांच्या युतीने जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून बंगा यांच्या नामांकनाचे स्वागत आणि समर्थन करण्यासाठी एक खुले पत्र लिहिले आहे.

कोण आहेत अजय बंगा?

63 वर्षीय बंगा हे भारतीय-अमेरिकन असून सध्या जनरल अटलांटिक या इक्विटी फर्मचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. अजय बंगा यांचे शालेय शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमधून झाले. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा सैन्यात अधिकारी होते आणि 1970 मध्ये हैदराबादमध्ये तैनात होते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद (आयआयएम) मधूनही त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले.

नेस्लेने 1981 मध्ये व्यवसाय करिअरला सुरुवात केली

1996 मध्‍ये सिटीग्रुपमध्‍ये सामील होण्‍यापूर्वी बंगा यांनी 1981 मध्‍ये नेस्लेसोबत करिअरची सुरूवात केली. पेप्सिकोमध्ये दोन वर्षे काम केले. त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंक या कंपन्यांतही काम केले आहे.

यापूर्वी एंटरप्राइझ कम्युनिटी पार्टनर्स आणि नॅशनल अर्बन लीगच्या विश्वस्त मंडळावर काम केले आहे आणि न्यूयॉर्क हॉल ऑफ सायन्सच्या विश्वस्त मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. ते आर्थिक शिक्षण परिषदेचे संचालकही होते.

याव्यतिरिक्त 2005 ते 2009 पर्यंत त्यांनी जगभरातील मायक्रोफायनान्स क्षेत्रातील सिटी ग्रुपच्या धोरणाचे नेतृत्व केले. 2016 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com