'All bodies are beach bodies': स्पॅनिश सरकारने लठ्ठ महिलांसाठी राबवली अनोखी मोहीम

वाढत्या लठ्ठपणामुळे महिला वेगवेगळे कपडे घालतांना आणि बाहेर जातांना संकोच करतात.
Spain Beach Campaign
Spain Beach CampaignDainik Gomantak

Spain Beach Campaign: अलिकडे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. त्यमुळे महिला वेगवेगळे कपडे घालतांना संकोच करतात. बाहेर जातांना संपुर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे महिला घालतात. पण प्रत्येक स्त्रीच्या शरीराची रचना वेगळी असते. लटकलेले पोट, वाढलेली कंबर किंवा लठ्ठपणामुळे महिलांना इतरांसमोर यायला अस्वस्थ वाटते. या परिस्थितीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी स्पेनच्या समानता मंत्रालयाने (Equality Ministry) एक नवे पाऊल उचलले आहे आणि या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पेनने महिलांमधील त्यांच्या शरीराप्रती नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर (Beach) उन्हाळी शिबिरे आयोजित केली आहेत. समानता मंत्रालयाचे म्हणणे आहे की, 'प्रत्येक स्त्री स्वतःच्या अधिकारात विशेष आहे.दिसायला सुंदर आहे. आपल्या शरीराच्या आकाराची पर्वा न करता, त्या समुद्रकिनार्यावर येण्यास नेहमीच तयार असायला पाहिजे.'

Spain Beach Campaign
Punjab Police: पाकिस्तानी ड्रोनमधून टाकलेले 5 किलो हेरॉईन जप्त

समाजिक मंत्री इऑन बेलारा यांनी “उन्हाळा आमचाही आहे” या स्लोगनसह यंदाच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात केली. त्याच्या पोस्टरमध्ये वेगवेगळ्या शरीरयष्टी असलेल्या पाच महिलांचे फोटो लावण्यात आले आहे. आणि त्याखाली, 'All Bodies Are Beach Bodies' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

महिला संस्थेच्या प्रमुख अँटोनिया मोरिल्लास यांनी सांगितले की, 'शारीरिक दुर्लक्षामुळे महिलांच्या आत्मसन्मानावर परिणाम तर होतोच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते. असे होऊ नये, महिलांनी आपल्या शरीराबाबत कोणतीही नकारात्मक विचारसरणी करू नये, हा संदेश देण्यासाठीच हे उन्हाळी शिबिर राबवण्यात येत आहे.'

Spain Beach Campaign
Baghdad Protest: श्रीलंकेनंतर आंदोलकांनी इराकी संसदेच्या इमारतीवर केला कब्जा

मात्र, सरकारची ही मोहीम स्पेनमधील सर्वांनाच आवडली असे नाही. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. याचा वापर विशेषतः पुरुषी समाजाविरुद्ध होत आहे का, अशी टिप्पणी काही लोकांनी केली. त्याचवेळी डावे नेते कायो लारा म्हणाले की, ही मोहीम म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com