मेलानिया यांनीही घातला मास्क

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

मेलानिया यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घातल्याचे छायाचित्र अनेक आठवड्यांत प्रथमच पाहायला मिळाले.

वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांनीही मास्क घालण्यास सुरवात केली आहे. अध्यक्षांप्रमाणेच त्यांच्या पत्नीनेही मास्कवर फुली वापरणे टीकेचे कारण ठरले होते.
अध्यक्षांनी लष्करी रुग्णालयाला भेट दिली तेव्हा मास्क घातला होता. ती छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेलानिया यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी मेरी एलिझाबेथ हाऊसला भेट दिली होती. तेथे कुमारी माता व त्यांच्या मुलांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना कौशल्य, समुपदेशन, शैक्षणिक सुविधा अशी मदत पुरविली जाते.
मेलानिया यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घातल्याचे छायाचित्र अनेक आठवड्यांत प्रथमच पाहायला मिळाले. याठिकाणी काही वेळ व्यतीत करणे आणि केंद्रातील कर्मचारी, माता व मुलांशी संवाद साधणे आनंददायक ठरले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या