अ‍ॅमेझॉनला या कारणामुळे बदलावा लागला लोगो; हिटलरच्या मिशांशी केली होती तुलना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपला अ‍ॅप लोगो बदलला. त्यानंतर या लोगो वरून बराच विरोध झाला. काही लोकांनी या लोगो ची तुलना अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या मिशाशी केली.

नवी दिल्ली: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपला अ‍ॅप लोगो बदलला. त्यानंतर या लोगो वरून बराच विरोध झाला. काही लोकांनी या लोगो ची तुलना अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या मिशाशी केली. नंतर कंपनीने कारवाई करत पुन्हा अ‍ॅपचा लोगो बदलला. मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या मिश्यासारखा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनने लोगो वरील निळ्या रंगाची रिबन बदलली.

कंपनीने जानेवारी महिन्यात नवीन लोगोचे अनावरण केले होते. ज्यावर जुन्या आणि परिचित शॉपिंग कार्टच्या लोगो एवजी तपकिरी कार्डबोर्ड बॉक्ससह निळ्या रंगाचे रिबन आणि त्याखालील स्माईलीच्या आकारात अ‍ॅमेझॉनची स्वाक्षरी दिली आहे. पाच वर्षांत अ‍ॅमेझॉनने त्याच्या अ‍ॅप आयकॉनमध्ये केलेला हा पहिला बदल होता.

निळ्या रंगाच्या टेपच्या दातासारख्या दिसणाऱ्या तुकड्याने बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांना हिटलरच्या टूथब्रश-स्टाईल मिशाची आठवण करून दिली. अनेकांनी ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या लोगोचा निषेध केला तर काहींनी हा आयकॉन ट्रोल करणे सुरू केले. वापरकर्त्याचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनने निळ्या रंगाच्या टेपचे डिझाइन शांतपणे बदलले. आता निळ्या रंगाच्या टेपच्या आकारात आणि डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे आणि त्याची रचना बदलली गेली आहे. 

टुथब्रश सारख्या दिसणाऱ्या मिशा चार्ली चॅपलिन आणि ऑलिव्हर हार्डी या विनोदी कलाकारांमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच जर्मन नाझी नेते अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या आधीच लोकप्रिय झाल्या होत्या. मेझॉनने या वर्षाच्या सुरूवातीस, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मायन्ट्रानेही मुंबईत तक्रार दिल्यानंतर नवीन लोगो प्रसिद्ध केला होता. 

संबंधित बातम्या