America Air Strike: अमेरिकेने केला अजून एक एअर स्ट्राइक, 30 दहशतवादी मारल्याचा दावा

अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यात मध्य सोमाली शहराजवळ सुमारे 30 इस्लामिक अल-शबाब संघटनेचे दहशतवादी ठार झाले आहेत.
America Air Strike
America Air StrikeDainik Gomantak

अमेरिकन सैन्याने शुक्रवारी (20 जानेवारी) सोमालिया शहरावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात अल-शबाबचे सुमारे 30 सैनिक मारले गेले. अमेरिकन लष्करी हल्ला सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 260 किमी उत्तर-पूर्वेला गलकाडजवळ झाला.

यूएस आफ्रिका कमांडने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकही नागरिक जखमी किंवा ठार झाला नाही. अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यात मध्य सोमाली शहराजवळ सुमारे 30 इस्लामिक अल-शबाब संघटनेचे दहशतवादी ठार झाले आहेत. असे यूएस आफ्रिका कमांडने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

America Air Strike
Aliens-Human War: 2023 बाबत सर्वात भयानक भविष्यवाणी, दूसरी दुनिया से...!

CNN ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने सोमालियाच्या राष्ट्रीय सैन्याच्या समर्थनार्थ मोठा हल्ला केला. 100 हून अधिक अल-शबाब सैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर सोमालियाच्या सैन्यात लढाई झाली. असे निवेदनात म्हटले आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा अल कायदाशी संबंध आहे. एका संरक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ला केल्याने कोणतेही अमेरिकन सैन्य यावेळी जमिनीवर उपस्थित नव्हते.

“सोमालिया संपूर्ण पूर्व आफ्रिकेत स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी केंद्रस्थानी असलेला देश आहे. यूएस आफ्रिका कमांड फोर्स अल-शबाब या सर्वात मोठ्या आणि सर्वात घातक अल-कायदा गटाच्या विरोधात त्यांची कारवाई सुरूच ठेवणार आहे."

"अल-शबाबला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात घातक अल-कायदा नेटवर्कला पराभूत करण्यासाठी आवश्यक मदत करताना अमेरिकेचे सैन्य सहयोगी दलांना प्रशिक्षण आणि सल्ला देणेही सुरू ठेवेल," असे अमेरिकेच्या निवेदनात म्हटले आहे.

America Air Strike
Watch Video: खोल दरीत केबलला लटकली बस, नेपाळमधील धोकादायक वाहतूक पाहून तुम्हाला धक्का बसेल

अलिकडच्या काही महिन्यांत यूएस सैन्याने या प्रदेशात अनेक हल्ले केले आहेत ज्यामुळे अल-शबाबचे अनेक लोक मारले गेले आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मोगादिशूच्या वायव्येस 218 किमी अंतरावर अल-शबाबचे दोन सदस्य ठार झाले.

मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 285 किलोमीटर अंतरावर नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या हल्ल्यात अल-शबाबचे 17 सैनिक मारले गेले. डिसेंबर 2022 मध्ये अमेरिकेच्या दुसर्‍या हल्ल्यात कॅडेल शहराजवळ अल-शबाबचे सहा दहशतवादी ठार झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com