भारतीय IT दाम्पत्यांसाठी खुशखबर, जोडीदारालाही मिळणार अमेरिकेत नोकरीची संधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सरकारने इमिग्रेशन नियमात शिथिलता आणली आहे.
भारतीय IT दाम्पत्यांसाठी खुशखबर, जोडीदारालाही मिळणार अमेरिकेत नोकरीची संधी
भारतीय IT दाम्पत्यांसाठी खुशखबर, जोडीदारलाही मिळणार अमेरिकेत नोकरीची संधी Dainik Gomantak

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सरकारने इमिग्रेशन नियमात शिथिलता आणली असून आता (H-1B) व्हिसाधारकांच्या (H-1B visa) जोडीदाराला स्वयंचलित वर्क ऑथोरायझेशन परमिट मिळू शकेल. सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ असा की H-1B व्हिसाद्वारे (H-1B visa) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांना आता अमेरिकेत (America) काम मिळू शकते. अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा फायदा हजारो भारतीयांना (Indians) होणार आहे.

हा निर्णय होमलँड सिक्युरिटी विभागाच्या क्लास-एक्शन खटल्यातील निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तो अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशन (AILA) ने स्थलांतरीत पती- पत्नीच्या वतीने दाखल केला होता. AILA चे जॉन बास्डेन यांनी सांगितले की हे H4 व्हिसा धारक असे लोक आहेत जे नेहमी रोजगार अधिकृतता कागदपत्रांच्या स्वयंचलित विस्तारासाठी नियामक चाचणीची पूर्तता करतात. परंतु तरीही त्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांना अधिकृत करावे लगता आहे. यामुळे अनेक लोक आपल्या नोकऱ्या गमावत आहेत आणि यामुळे अमेरिकन व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. AILA ने बायडन सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे .

भारतीय IT दाम्पत्यांसाठी खुशखबर, जोडीदारलाही मिळणार अमेरिकेत नोकरीची संधी
जगात आजपर्यंत 'या' ठिकाणी कोरोना पोहोचू शकला नाही

H-4 व्हिसा अशा लोकाना दिला जातो जे H-1Bव्हिसा घेवून अमेरिकेत राहतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या राजवटीमध्ये H-1Bव्हिसाधारकांच्या जोडीदाराच्या काही कॅटेगरीना काम करण्याचा अधिकार देण्यात आला होता. आतापर्यंत 90 हजारांहून अधिक H-4 व्हिसाधारकांना कामाची अधिकृतात मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही भारतीय- अमेरिकन स्त्रियांची आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com