NASA: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपले Merging Galaxies चे अद्भुत दृश्य

नासाने आकाशगंगेत पाठवलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने अनेक अद्भुत दृश्यं टिपले आहेत.
Merging Galaxies| NASA
Merging Galaxies| NASADainik Gomantak

नासाच्या (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पुन्हा एकदा नवा फोटो शेअर केला आहे. एकमेकांत विलीन होणाऱ्या आकाशगंगांच्या जोडीचे फोटो घेतले आहे. ज्याला II ZW 96 असेही म्हणतात. डेल्फिनस नक्षत्रात विलीन होणारी आकाशगंगा सुमारे 500 प्रकाश-वर्षे दूर आहे. या आकाशगंगेच्या विलीनीकरणानंतर दोन्हीच्या आकारात बदल झाला आहे. विलीनीकरणानंतर दोन्ही आकाशगंगा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली वळल्या आहेत असे दिसत आहे.

हे फोटो जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने त्याच्या सभोवतालच्या आकाशगंगेमधील करण्यासाठी टिपले होते. ज्याचा अभ्यास वेबच्या संवेदनशील उपकरणांद्वारे करण्यात आला आहे. या इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सीमधील आकाशगंगा सूर्यापेक्षा 100 अब्ज पट अधिक तेजस्वी आहे.

Merging Galaxies| NASA
India-Nepal Border Dispute: उत्तराखंडात भारत-नेपाल सीमेवर तणाव; भारतीय मजुरांवर दगडफेक
  • अनेक रंगात दिसणारी आकाशगंगा
    नासाचे अशे मत आहे की आकाशगंगा ही अनेक रंगांमध्ये दिसतात. या प्रकारची जोडी विविध तरंगलांबीमध्ये विशेष तेजस्वी असते. जी तारा तयार होण्याच्या प्रक्रियेमुळे होते.

    नासाने सांगितले की या आकाशगंगांची चमक सूर्यापेक्षा 100 अब्ज पट जास्त आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या जोडीला खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने केवळ एक चाचणी म्हणून निवडले होते. II ZW 96 चा अभ्यास या आधी हबल स्पेस टेलिस्कोप आणि इतर वेधशाळांचा वापर करून निरीक्षण करण्यात आले आहे, शास्त्रज्ञांना विश्वास आहे की, वेब स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून गॅलेक्टिक वातावरणाबद्दल अधिक माहिती देईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com