क्युबा पुन्हा ‘दहशतवादी देश’ म्हणून घोषित

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

सत्तेचे काहीच दिवस शिल्लक असताना ट्रम्प प्रशासनाने क्युबाला पुन्हा एकदा ‘दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश’ म्हणून जाहीर केले आहे.

वॉशिंग्टन : सत्तेचे काहीच दिवस शिल्लक असताना ट्रम्प प्रशासनाने क्युबाला पुन्हा एकदा ‘दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश’ म्हणून जाहीर केले आहे. बराक ओबामा अध्यक्ष असताना त्यांनी क्युबाला या आरोपातून सूट दिली होती. 

क्युबामध्ये सरकार लोकांवर दडपशाही करत असून व्हेनेझ्युएलासह इतर काही देशांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे लक्षात आले आहे. इतर देशातील दहशतवादी कारवायांना ते सातत्याने पाठिंबा देत असल्याने त्यांना आम्ही पुन्हा एकदा धोकादायक देश म्हणून जाहीर केले आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या