अमेरिका नरमली; परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसल्याबद्दल दिलं स्पष्टीकरण  

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

अमेरिकेच्या नौदलाचे एक जहाज परवानगी न घेता भारतीय हद्दीत घुसले आणि भारतीय नौसैनिकांना धमकीही दिली. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या नौदलाने परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसून भारताला धमकावल्याचे स्वत:  मान्यही केले आहे. या सर्व घटनाक्रमवार भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर आता अमेरिकेने याबाबत नरमाईची भूमिका घेत  स्पष्टीकरण दिले आहे. 

संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटात अडकला असताना भारताचा मित्रदेश असलेल्या अमेरिकेनेच भारताला धमकावल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आणि कोरोनाच्या नवीन प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासंबंधी चर्चा करत असताना अमेरिकेच्या नौदलाचे एक जहाज परवानगी न घेता भारतीय हद्दीत घुसले आणि भारतीय नौसैनिकांना धमकीही दिली. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या नौदलाने परवानगीशिवाय भारतीय हद्दीत घुसून भारताला धमकावल्याचे स्वत:  मान्यही केले आहे. या सर्व घटनाक्रमवार भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर आता अमेरिकेने याबाबत नरमाईची भूमिका घेत  स्पष्टीकरण दिले आहे. 

अमेरिकेच्या नौदलाची भारताला धमकी; काय आहे FONOP? जाणून घ्या

गेल्या आठवड्यात 7 एप्रिल रोजी, अमेरिकेचे हवामानविषयक राजदूत जॉन कॅरी भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी यूएस नेव्हीचे डिस्ट्रॉयर (विनाश करणारे एक जहाज) यूएसएस जॉन पॉल जोन्स (डीडीजी 53) कोणतीही परवानगी न घेतला भारताच्या हद्दीत घुसले आणि भारताला धमकी दिली. इतकेच नव्हे तर भविष्यातही असे करण्याचा इशाराही दिला. या सर्व घटनाक्रमावर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले आहे. ''7 एप्रिलला यूएस नौदलाच्या 7 व्या फ्लीट मधील यूएसएस जॉन पॉल जोन्स या जहाजाने यांनी हिंद महासागरात रुटीन फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन मोहीम (FONOP)राबवली.   मात्र, भारत-प्रशांत महासागर क्षेत्रामधील क्षेत्रीय सुरक्षेसह अनेक गोष्टींसाठी आम्ही भारताचा आदर करतो, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.  (America softly; Explanation given for entering Indian border without permission) 

एलएसी'वर चीनकडून HQ9 आणि HQ22 क्षेपणास्त्र तैनात; भारतानेही मजबूत केले...

खरतर यूएन सागरी कायद्यानुसार, समुद्र किनाऱ्यापासून 200 नाविक मैल  (370 किमी) एक विशिष्ट आर्थिक क्षेत्र आहे. अशा परिस्थितीत भारताच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी अमेरिकेच्या जहाजाने भारताची परवानगी घेणे आवश्यक होते,  परंतु तसे न करता अमेरिकन जहाजाने 130 नाविक मैल (240 किमी) आत प्रवेश केल्याचा दावा स्वतः अमेरिकन नौदलाच्या 7 व्या ताफ्याने केला आहे.  तर, अशा प्रकारच्या मोहिमेसाठी अमेरिकेच्या नौदलाला भारतीय नौदलाची परवानगी मागायला सांगणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांत बसत नाही, असे निवेदन अमेरिकेच्या 7 व्या फ्लीटच्या पब्लिक अफेयर्सने दिले आहे.  दरम्यान, या सर्व घटना क्रमवार अमेरिकेच्या नौदलानेही स्पष्टीकरण दिले आहे.  ही कारवाई किंवा  मोहीम  म्हणजे  फ्रीडम ऑफ नॅव्हीगेशन ऑपरेशन (नौकानयन शास्त्राचे स्वातंत्र्य) होते.  जे देश त्यांच्या देशातील सागरी हद्दीतील सीमा वाढवून सांगत असतात त्या देशांच्या सागरी हद्दीत घुसून त्यांना आव्हान दिले जाते. हे कोणत्याही एका देशाच्या विरोधात नाही किंवा हे कोणत्याही प्रकारचे राजकीय विधान नाही, असे अमेरिकी नौदलाने म्हटले आहे.  

 

संबंधित बातम्या