America : मानव रहित ड्रोनद्वारे विमानात इंधन भरण्यास मिळाली सफलता

America : मानव रहित ड्रोनद्वारे विमानात इंधन भरण्यास मिळाली सफलता
America Success in refueling aircraft with unmanned drones

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) इतिहासात नेव्ही (US Navy) आणि बोईंग कंपनीने एकत्रितपणे मानवरहित ड्रोनच्या (Unmanned Drone) पध्दतीने विमानात इंधन भरण्यात आले आहे. नौसेना आणि बोईंग कंपनीच्या संयुक्त प्रयत्नात मानव रहित ड्रोन एम क्यू – 25 टी 1 (MQ-25T1)  उड्डाणाच्या वेळी विमानात इंधन भरण्यात सफलता मिळाली आहे. (America Success in refueling aircraft with unmanned drones)

याबाबत माहिती देताना नौदलाचे रियर अ‍ॅडमिर ब्रायन कोरे (Rear Admiral Brian Corey) म्हणाले, नौसेनेच्या ड्रोनने हवेत इंधन भरण्याच्या एम क्यू – 25 टँकर मोहिमेला यश मिळाले असून यामुळे विमान वाहकांच्या क्षमतेमध्ये वाढ होईल. या चाचणीत नौदलाचे विमान एफ / ए – 18 सुपर हॉर्नेट हवेत असलेल्या बोईंग कंपनीच्या मानव रहित ड्रोन एमक्यू 25 टी 1 संपर्कात आले, आणि  त्याने यशस्वीरीत्या आपल्या एरियल रिफ्यूलिंग स्टोरमधून इंधन एफ / ए – 18 मध्ये भरले.  

नेव्हीच्या मानवरहित करियर एव्हिएशन प्रोग्राम ऑफिसचे मॅनेजर कॅप्टन चाऊ रिड म्हणाले, या मिशनमुळे आमच्या लढाऊ विमानांना खूप फायदा होईल. यामुळे इंधनाची मोठी समस्या सुटण्यास मदत होईल. आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com