Imran Khan: अमेरिका मालक, पाकिस्तान भाड्याची बंदूक; इम्रान खान विरोधकांवर हल्लाबोल

इम्रान आता वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यात बरोबरीचे संबंध असावेत अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak

अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध मालक आणि नोकरसारखे आहेत. पाकिस्तानचा वापर भाड्याच्या बंदुकीसारखा झाला आहे. असे वक्तव्य पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान केले आहे. परकीय कट कारस्थानामुळे पदच्युत झाल्याचा आरोप सातत्याने इम्रान खान (Imran Khan) करत आहेत. इम्रान आता वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यात बरोबरीचे संबंध असावेत अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली आहे.

Pakistan
Thane: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड राजीनामा द्यायच्या तयारीत

अमेरिकेच्या भूमिकेवर आपल्या पूर्वीच्या वक्तव्यांचा संदर्भ देताना इम्रान खान म्हणाले, "माझ्यासाठी अमेरिकेचा संबंध संपला आहे, माझ्यासाठी आता तो भूतकाळ आहे. अमेरिकेसोबतचे आमचे नाते मालक-नोकरसारखे आहे. भाड्याच्या बंदुकीप्रमाणे आमचा वापर केला जात होता. पण यासाठी मी अमेरिकेपेक्षा आमच्या सरकारांना जबाबदार धरतो."

रशिया युक्रेनच्या युद्ध सुरू व्हायच्या पूर्वसंध्येला इम्रान खान यांनी मॉस्कोचा दौरा केला होता. इम्रान यांच्या मॉस्को दौऱ्याचा युद्धाशी संबंध जोडण्यात आला. यावर उत्तर देताना इम्रान खान म्हणाले ही बाब “लज्जास्पद” आहे. कारण रशिया दौरा काही महिन्यांपूर्वीच ठरला होता. "आपल्याकडे सध्या जनतेतून निवडून आलेले सरकार नाही, अशा काळात सैन्य आणि लोकांवर मोठी जबाबदारी आहे."

Pakistan
स्टेज चारचा कॅन्सर, धड चालताही येत नव्हते; गोव्याच्या IPS अधिकाऱ्याने पूर्ण केली आव्हानात्मक आयर्नमॅन स्पर्धा

दरम्यान, पाकिस्तान येथे आयोजित लाँग मार्च दरम्यान, इम्रान खान यांच्या पायावर गोळी लागली. त्यानंतर सात दिवस खान दवाखान्यात दाखल होते. दवाखान्यातून खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मार्च सुरू करणार असे सांगितले होते. त्यानुसार खान यांनी मार्चला पुन्हा सुरूवात केली असून, पुन्हा निवडणूक घेण्याच्या मागणीसह ते विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com