अमेरिकेचं 'सरकार' सायकलवरुन पडलं, जो बायडन यांचा व्हिडीओ होतोय व्हायरलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.
अमेरिकेचं 'सरकार' सायकलवरुन पडलं, जो बायडन यांचा व्हिडीओ होतोय व्हायरलं
Joe BidenDainik Gomantak

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये ते व्हाईटहाऊसमध्ये सायकल चालवत असताना दिसत आहेत. मात्र सायकल चालवत असतानाचा त्यांचा अचानक तोल गेला आणि ते पडले. मात्र, या घटनेनंतर ते लगेच उठले आणि म्हणाले, मी पूर्णपणे ठीक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना शनिवारी सकाळी घडली.

घटनेच्या वेळी ते पत्नीसोबत सायकल चालवत होते. यादरम्यान, ते जवळून जाणाऱ्या लोकांशी बोलण्यासाठी थांबले.

दुसरीकडे, व्हिडिओमध्ये जो बायडन (Joe Biden) पत्नी जिलसोबत घराजवळील रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहेत. यादरम्यान ते तिथे थांबलेल्या लोकांना बोलण्यासाठी थांबतात आणि याचदरम्यान ही घटना घडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com