Plane Crashes into Power Lines: अमेरिकेतील माँटगोमेरी काउंटीमध्ये विजेच्या तारांना धडकले विमान , 90 हजार घरांची बंत्ती गुल

वीज कधी परत येईल, हे सध्या तरी सांगता येत नाही.
Plane Crashes into Power Lines
Plane Crashes into Power LinesDainik Gomantak

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात काल रात्री 27 नोव्हेंबरला एका लहान विमानाची वीज तारांना टक्कर झाली. तेव्हापासून, मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्याची नोंद झाली आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, परंतु काउंटीमधील ब्लॅकआउटमुळे 90,000 हून अधिक घरे अंधारात आहेत. यासोबतच लोकांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. 

मॉन्टगोमेरी काउंटी पोलीस विभागाने ट्विट केले की, "रॉथबरी डॉ अँड गोशेन आरडी परिसरात एक लहान विमान वीज तारांवर कोसळले, ज्यामुळे काउंटीच्या काही भागांमध्ये वीज खंडित झाली." पावसाळी वातावरणामुळे हे छोटे विमान व्यावसायिक क्षेत्राजवळ कोसळले. विमान 10 मजल्यापर्यंत विजेच्या तारांना धडकले असावे, असा अंदाज आहे. वीज कधी परत येईल, हे सध्या तरी सांगता येत नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com