दक्षिण कोरियामध्ये सत्तांतर, नव्या अध्यक्षांचा उत्तर कोरियाला खास संदेश

दक्षिण कोरियाचे पुराणमतवादी नेते युन सुक येओल यांनी आज देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
Yoon Suk Yol On South Korea
Yoon Suk Yol On South KoreaANI

Yoon Suk Yol On South Korea: दक्षिण कोरियाला यून सुक-योलच्या रूपाने नवीन अध्यक्ष मिळाले आहे. जर उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त करण्यास सहमत असेल तर ते आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मजबूत योजना सादर करतील, असे वक्तव्य पदभार स्विकारल्यानंतर दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी केले. दक्षिण कोरियाचे पुराणमतवादी नेते युन सुक येओल यांनी आज मंगळवारी देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. (New President Of South Korea)

Yoon Suk Yol On South Korea
पुतिन वयाच्या 70 व्या वर्षी पुन्हा होणार वडील ?

उत्तर कोरियाशी चर्चेचे दरवाजे खुले राहतील

युन सुक येओल यांनी मंगळवारी सोल येथे त्यांच्या शपथविधी समारंभात सांगितले की, "उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी संवादाचे दरवाजे खुले राहतील. आमचे सरकार एक मजबूत योजना सादर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास तयार आहे ज्यामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या मजबूत होईल आणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारेल."

योल यांनी किम जोंग उन यांना संदेश देण्याचे टाळले

उत्तर कोरियाच्या विरोधात नेहमीच कठोर भूमिका घेणारे यून यांनी आपल्या भाषणात उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या तयारीबद्दल उपस्थित केलेल्या चिंतेविरूद्ध कोणताही भडकावू वक्तव्य करणे टाळले. दरम्यान उत्तर कोरियाने यापूर्वीही अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाचे प्रस्ताव फेटाळल्यामुळे त्याचा प्रस्ताव स्वीकारणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Yoon Suk Yol On South Korea
उत्तर कोरियाने पुन्हा डागले अज्ञात लक्ष्यावर मिसाइल, दक्षिण कोरियाचा दावा

प्रमुख विरोधी पीपल पॉवर पार्टीच्या 60 वर्षीय युन यांनी 48.6 टक्के मते मिळवून सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ली जे-म्युंग यांची अध्यक्षीय शर्यतीतून हकालपट्टी केली. डेमोक्रॅटिक पक्षाला 47.8 टक्के मते मिळाली.आणि आता दक्षिण कोरियाला यून सुक-योलच्या रूपाने नवीन अध्यक्ष मिळाले आहे. यावेळी यून सुक-योल यांनी मूनवर उत्तर कोरियाच्या अधीन असल्याचा आरोप केला आणि उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाबाबत कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com