भारतसोबत कुठलाही संघर्ष नको आहे: तालिबान

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मुट्टाकी यांनी दावा केला की तालिबानने अफगाणिस्तानातील सर्व पुरातन गटांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वसमावेशक सरकार स्थापन केले आहे.
भारतसोबत कुठलाही संघर्ष नको आहे: तालिबान
Amir Khan Muttaqi: Taliban don't want confrontation with IndiaDainik Gomantak

अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नेतृत्वाखालील सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी (Amir Khan Muttaqi) यांनी पुन्हा एकदा तालिबानची इतर देशांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानला भारतासह (India) कोणत्याही देशाशी संघर्ष नको आहे.अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. प्रथमच एका महिला पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अफगाणिस्तानने कोणत्याही देशाशी संघर्ष करावा किंवा देशाला प्रभावित करणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही.(Amir Khan Muttaqi: Taliban don't want confrontation with India)

तालिबान राजवटीत अफगाणिस्तान-भारत संबंधांवर बीबीसी उर्दू पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, "जेव्हा आम्ही मॉस्को परिषदेला उपस्थित होतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांचे प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. आणि आम्ही या पुढेही चर्चा सुरू ठेवू असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, मुट्टाकी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तालिबान पाकिस्तानमध्ये शांततेसाठी इम्रान सरकार आणि प्रतिबंधित संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्यातील वाटाघाटीमध्ये मध्यस्थी करत आहे. आणि या चर्चेचे सकारात्मक परिणाम होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी हे गेल्या दोन आठवड्यांपासून दक्षिण-पूर्व प्रांत खोस्तमध्ये दोन्ही बाजूंच्या बैठकीचे आयोजन करत आहेत.

Amir Khan Muttaqi: Taliban don't want confrontation with India
तालिबानला मान्यता न देता अफगाणिस्तानातील टाळता येऊ शकते उपासमारी?

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मुट्टाकी यांनी दावा केला की तालिबानने अफगाणिस्तानातील सर्व पुरातन गटांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वसमावेशक सरकार स्थापन केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मुट्टाकी म्हणाले की, जुन्या सरकारच्या प्रतिनिधींना नव्या सरकारमध्ये सामील करून घेण्यासाठी तालिबानवर दबाव आणण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्राला नाही.तर दुसरीकडे यूएस लष्करी छावण्यांमध्ये राहणारे 50,000 हून अधिक अफगाण निर्वासित अजूनही चिंतेत आहेत. त्या निर्वासितांना कायमस्वरूपी समाधान कधी मिळेल हे त्यांना माहीत नाही. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर या निर्वासितांना आठ अमेरिकन लष्करी तळांवर ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com