कॅनडामधून भारतात होणार प्राचीन मुर्तीचे आगमन

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

हिंदू देवता अन्नपूर्णा देवीची एक प्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती कॅनडा सरकार लवकरच भारताला परत करणार आहे

टोरांटो: हिंदू देवता अन्नपूर्णा देवीची एक प्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती कॅनडा सरकार लवकरच भारताला परत करणार आहे. ही मूर्ती वाराणसीमधील एका मंदिरातून शंभर वर्षांपूर्वी चोरीला गेली होती.

सध्या ती कॅनडामधील रेजिना विद्यापीठाच्या आर्ट गॅलरीमध्ये आहे. कलाकार दिव्या मेहरा यांनी ही बाब संबंधित विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर दोन दिवसांपूर्वी ही मूर्ती भारताकडे सुपूर्द करण्याचा अधिकृत कार्यक्रम झाला. 

आणखी वाचा:

‘ड्युरँड रेषेवर शांतता गरजेची’

संबंधित बातम्या