पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये संतप्त जमावाने तोडफोड करत हिंदूंच्या मंदिरला आग लावली

PTI
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

पकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वाच्या कराक जिल्ह्यात संतप्त जमानावे बुधवारी एका हिंदू मंदिराची तोडफोड करतम मंदिराला आग लावली. खैबर पख्तूनख्वाच्या कराक जिल्ह्यातील तेरी या गावात ही घटना घडली आहे. 

कराक : पकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वाच्या कराक जिल्ह्यात संतप्त जमानावे बुधवारी एका हिंदू मंदिराची तोडफोड करतम मंदिराला आग लावली. खैबर पख्तूनख्वाच्या कराक जिल्ह्यातील तेरी या गावात ही घटना घडली आहे. जमीअत उलेमा-ए-इस्लाम'च्या झालेल्या सभेनंतर काही तासातच ही घटना घडली. या सभेत गर्दीला हिंसेस प्रवृत्त करणारी भाषणे करण्यात आली होती. यानंतर जमावाने मंदिरावर हल्ला करत तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

जमीअत उलेमा-ए-इस्लाम'च्या अमीर मौलाना अताउर यांनी आमच्या पक्षाचा व मंदिराची तोडफोड केरण्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पेशावरमधले हिंदू समुदयाचे नेते हारून सरब दियाल म्हणाले, या घटनेमुळे दिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, इस्लामित विचारधारा परिषदेने याची गंभीर दखल घ्यावी.पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे. पाकिस्तानातअंदाजे 75 लाख हिंदू राहतात. पाकिस्तानचमध्ये बहुसंख्य हिंदूसिंध प्रांतात राहतात जिथे ते मुस्लिम समाजाशी जुळवून घेत गुण्या गोविंदाने राहतात.या प्रांतात हिंदूना अनेकदी अतिरेक्यांकडून त्रास दिला जातो. 

संबंधित बातम्या